Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी! DRDO च्या करोना प्रतिबंधक औषधाला DCGI ची आपत्कालीन वापरास मंजुरी

मोठी बातमी! DRDO च्या करोना प्रतिबंधक औषधाला DCGI ची आपत्कालीन वापरास मंजुरी

दिल्ली l Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बिकट स्थिती आहे. अनेक राज्यांत करोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. अपुऱ्या वैद्यकीय उपकरणांमुळे रुग्णांचे हाल होत असून आरोग्य यंत्रणेवरही ताण पडत आहे.

- Advertisement -

यादरम्यान एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. DRDO च्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस (INMAS) आणि हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅबोरिटरीजच्या सहकार्याने बनवण्यात आलेल्या 2-DG या कोविड प्रतिबंधक औषधाला केंद्र सरकारच्या ड्रग्ज कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) या विभागानं आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. भारतातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या करोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजन लेवल झपाट्याने कमी होणे ही मोठी समस्या आहे. यामुळे रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यासाठी 2-DG हे औषध फायदेशीर ठरणार आहे. क्लिनिकल ट्रायलमधील परिणामांनुसार, कोरोनाबाधित रुग्ण कमी वेळेत रिकव्हर होतात. तसेच रुग्णांना रुग्णांलयात ऑक्सिजनचा वापरही कमी करावा लागत आहे. इतर उपचार पद्धतीच्या तुलनेने 2-DG च्या वापराने रुग्ण कमी वेळेत करोनावर मात करत आहेत, म्हणजे करोनोबाधित रुग्ण कमी वेळेत बरे होत आहेत.

DRDO ने विकसित केलेले हे औषध पावडर स्वरुपात मिळेल. हे पाण्यामध्ये टाकून घ्यावं लागते. हे औषध संसर्ग झालेल्या पेशींमधील विषाणूंचा संसर्ग कमी करण्यासोबत संसर्ग रोखण्याचं काम करत. त्यासोबतचं रुग्णाच्या शरीरातील उर्जा वाढवण्याचंही काम करते.

DRDO ने एप्रिल २०२० मध्ये या औषधावर काम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर या औषधाच्या क्लिनिकल ट्रायल्सदरम्यान आढळून आलं की, हे औषध SARS-Cov-2 (कोविड-१९) या आजारावर प्रभावीपणे काम करते. दरम्यान, या औषधाच्या फेज-२ मधील क्लिनिकल ट्रायलला मे २०२० मध्ये परवानगी दिली होती. त्यानंतर मे-ऑक्टोबर २०२० मध्ये डीआरडीओ आणि डॉ. रेड्डी यांनी मिळून फेज-२ च्या ट्रायलला सुरुवात केली होती. फेज-२ची ट्रायल ६ रुग्णालयांमध्ये घेण्यात आली यामध्ये ११० रुग्णांवर याची चाचणी झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या