Friday, April 26, 2024
Homeनगरबोल्हेगावच्या शेतात गटारीचे पाणी

बोल्हेगावच्या शेतात गटारीचे पाणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बोल्हेगावच्या (Bolhegav) गांधीनगर (Gandhinagar) परिसरात बंद पाईप गटार योजना नसल्यामुळे गटारीचे पाणी (Sewer water) शेतकर्‍यांच्या शेतातून वाहत असल्याने उभ्या पिकांचे नुकसान (Crops Loss) होत आहे. बोल्हेगाव रोड ते खारवड्यापर्यत बाराशे व्यासाची बंद पाईप गटार योजनेचे काम 15 दिवसाच्या आत सुरू करावे, अन्यथा महानगरपालिकेत (Ahmednagar Municipal Corporation) शेतकर्‍यांच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा (Hint) नगरसेवक कुमार वाकळे (Corporators Kumar Wakale) यांनी मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे.

- Advertisement -

यावेळी रमेश वाकळे, मोहन वाकळे, भास्कर वाकळे, कचरू वाकळे, भीमा वाकळे, भाऊसाहेब वाकळे, बाळासाहेब वाकळे, किसन कोलते, संतोष वाटमोडे, ज्ञानदेव कापडे, राजू बंग, सावळेराम कापडे, सुरेश वाटमोडे आदी शेतकरी उपस्थित होते. बोल्हेगाव मधील शेतकर्‍यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे या शेतकर्‍यांची उपजिविका शेतीवरच अवलंबून आहे. परंतु या गटारीच्या दूषित पाण्यामुळे (Due to contaminated water) पिकांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याच बरोबर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर (Health question is serious) बनला आहे. तरी महापालिकेने लवकरात-लवकर लक्ष घालून बंद पाईप गटार योजनेचे (underground sewer scheme) काम करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या