Friday, April 26, 2024
Homeनाशिकनवीन नाशिक परिसरात ड्रेनेज मधील सांडपाणी रस्त्यावर

नवीन नाशिक परिसरात ड्रेनेज मधील सांडपाणी रस्त्यावर

नवीन नाशिक | Nashik

साईबाबा नगर परिसरात ड्रेनेज तुंबुन सांडपाणी रस्त्यावर साचल्याने परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले होते.

- Advertisement -

कायमस्वरूपी सांडपाणी साचण्याचा प्रकार होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत लोकप्रतिनिधी तसेच मनपा प्रशासनाला वारंवार तक्रारी करूनही ड्रेनेजचा प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रभाग क्रमांक २९ मधील साईबाबा नगर परिसरात ड्रेनेज लाईन तुंबुन सांडपाणी रस्त्यावर येण्याचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. अनेक वेळा सांडपाणी रस्त्यावर तुंबल्याने नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

याबाबत स्थानिक नगरसेवक तसेच मनपा अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी करूनही ड्रेनेजचा प्रश्न सुटत नाही. बुधवारी सकाळी पुन्हा ड्रेनेज लाईन तुंबल्याने सर्वत्र सांडपाणी रस्त्यावर तुंबले होते एकीकडे करोणा सारखी महामारी सुरू आहे मात्र या परिसरातील ड्रेसचा प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सर्वत्र सांडपाणी रस्त्यावर पसरल्याने या ठिकाणी डास मच्छर वाढले आहे सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत नगरसेवक मुकेश शहाणे तसेच स्थानिक पुढाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे पहायला मिळाले. लवकरात लवकर ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांकडून केली गेली.

यावेळी नगरसेविका रत्नमाला राणे यांनी मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ ड्रेनेजची दुरुस्ती करून दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या