Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याराहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा यांना दणका; 'ते' आंदोलन पडले महागात

राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा यांना दणका; ‘ते’ आंदोलन पडले महागात

मुंबई | Mumbai

विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्याविरोधात नुकतंच प्रारूप आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. वाढीव विज विलाविरोधात आंदोलन (Agitation) करणे या दोघांनाही महागात पडले आहे…

- Advertisement -

2020 साली जुलै महिन्यात लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील बेस्टच्या (Best)कथित वाढीव वीजबिलांच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करण्यात आले होते. यावेळी बेस्टच्या कार्यालयात घुसून बेस्टच्या महाव्यवस्थापकांशी गैरवर्तणूक आणि पोलिसांना धक्काबुक्की केल्याच्या खटल्यात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

शेतकरी एकवटले, कांदा विक्री बंद आंदोलन होणारच

राहुल नार्वेकर आणि कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेकांनी जमावबंदीचा आदेश मोडत आंदोलन केले होते. बेस्टच्या महाव्यवस्थापकांना त्यांचे कर्तव्य करण्यापासून रोखले, असा आरोप आहे. याप्रकरणाच्या तपासाअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

मोठी बातमी! अखेर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, ‘वाचा’ कोणत्या मंत्र्यांकडे कुठले खाते?

पोलिसांनी या प्रकरणातील सर्व संशयितांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 341, 332, 143, 147, सार्वजनिक मालमत्तेच नुकसान प्रतिबंधक कायदा आणि साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या