Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारआ.डॉ.विजयकुमार गावीत यांच्या प्रयत्नाने 10 कोटी रूपये मंजूर

आ.डॉ.विजयकुमार गावीत यांच्या प्रयत्नाने 10 कोटी रूपये मंजूर

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

नंदुरबार मतदार संघाचे आ.डॉ.विजयकुमार गावीत यांच्या प्रयत्नाने नंदुरबार तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी सीआरएफ अंतर्गत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी 10 कोटी रूपये मंजूर झाले आहे.

- Advertisement -

आ.डॉ.विजयमुमार गावीत यांनी नंदुरबार तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या राज्यमार्ग क्रमांक 9 ते पावला- कोठली- उमर्दे बु.- फुलसरे, पाचोराबारी, खामगांव, टोकरतळे, नांदखेडा, चाकळे, ढंढाणे या रस्त्यांसाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी करत सतत पाठपुरावा केला होता.

त्याच्या प्रयत्नाने यश आले असून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय रस्ते व निधीतंर्गत 22 कि.मी. च्या रस्त्यांना मंजूरी देण्यात आली असून यासाठी 10 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे.

राज्यमार्ग क्रमांक 9 ला हा रस्ता जोडल्यास नागरीकांची मोठी सोय होणार आहे. ही मागणी कधीपासून होत होती. आ.डॉ. विजयकुमार गावीत यांच्या मागणीला यश मिळाले असून याबाबत नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या