Saturday, April 27, 2024
Homeनगरडॉ. तनपुरे कारखान्याच्या उपोषणार्थी कामगारांना अध्यक्ष नामदेवराव ढोकणे यांनी दिला प्रस्ताव

डॉ. तनपुरे कारखान्याच्या उपोषणार्थी कामगारांना अध्यक्ष नामदेवराव ढोकणे यांनी दिला प्रस्ताव

उंबरे |वार्ताहर| Umbare

गेल्या सात दिवसांपासून डॉ. तनपुरे कारखान्याच्या (Dr. Tanpure factories) कामगारांचे उपोषण (Worker hunger strike) कार्यस्थळी सुरू आहे. याबाबत कारखाना प्रशासनासह मार्गदर्शक व तज्ज्ञ संचालक खा. डॉ. सुजय विखे (MP Dr. Sujay Vikhe), चेअरमन नामदेवराव ढोकणे (Chairman Namdevrao Dhokne), व्हा. चेअरमन दत्तात्रय ढूस (Vice Chairman Dattatraya Dhoos) यांच्यासह सर्व संचालकांनी त्यांची विचारपूस करून त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती चेअरमन नामदेवराव ढोकणे (Chairman Namdevrao Dhokne) यांनी दिली. याप्रकरणी ढोकणे यांनी डॉ.तनपुरे कारखान्याच्या (Dr. Tanpure factories) राष्ट्रीय कामगार सभेपुढे कामगारहिताचा प्रस्ताव दिला आहे.

- Advertisement -

प्रस्तावात म्हटले, सन 2017 साली खा. डॉ. विखे (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ सत्तेवर आले. मात्र, त्यापूर्वी कारखान्यावर पूर्वीच्या संचालक मंडळाने मोठ्या प्रमाणात देणे थकविलेले आहे. त्यानंतर विद्यमान संचालक मंडळाने कारखाना आर्थिक आरिष्टात असतानाही खा. डॉ. विखे (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली काही शासकीय देणी, सभासद व कामगारांची देणी दिली आहेत. अनेक आर्थिक अडचणींना तोंड देताना सरकारच्या धोरणानुसार हमीभाव, लेव्हीबाबत निबर्ंध, बँकेची देणी, विक्रीसाठी ठरवून दिलेला कोटा, यातून मार्ग काढून नव्या जोमाने कारखाना सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा परिस्थितीतून कामगारांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे.

माहे नोव्हेंबर 2021 पासून कारखान्याचे गाळप कामगारांच्या सहकार्यातून सुरू झाल्यास थकीत भविष्य निर्वाह निधीच्या थकीत रकमेपैकी उपलब्ध रकमेतून दरमहा 50 लाख रुपये भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा करता येतील. कारखान्याची आर्थिक परिस्थिती बघता थकीत माहे जुलै 2020 चा पगार दि. 10 सप्टेंबर 2021 पर्यंत अदा करण्यात येईल. तसेच ऑक्टोबर 2021 अखेरपर्यंत थकीत पगारापोटी 2 कोटी रुपये टप्प्याटप्प्याने देण्यास व्यवस्थापनाची तयारी आहे. उर्वरित थकीत पगाराची 6 कोटी रुपये रक्कम जमीन विक्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्यवस्थापनाकडून अदा करण्यात येईल.

गाळप सुरू झाल्यास प्रत्येक महिन्याचा पगार व भविष्य निर्वाह निधी देण्यास व्यवस्थापन कटिबद्ध आहे. सेवानिवृत्त कामगारांचे थकीत देण्याबाबत नोव्हेंबर 2021 मधील आर्थिक परिस्थितीनुसार देणी अदा केली जातील, असा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती चेअरमन ढोकणे यांनी दिली. हा प्रस्ताव स्वीकारून उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन ढोकणे यांनी उपोषणार्थी कामगारांना केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या