Friday, April 26, 2024
Homeनगरडॉ. शेळकेला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

डॉ. शेळकेला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेतील 22 कोटींच्या फसवणूक प्रकरणी डॉ. निलेश शेळकेला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

त्याला मंगळवारी मोरवाडी न्यायालयात हजर केले असता 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.

नगर अर्बन बँकेचे अधिकारी महादेव साळवे यांच्या फिर्यादीवरून 25 जानेवारी 2021 रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. प्रत्रेकी 11 कोटी रुपरांची दोन बोगस कर्ज प्रकरणे करण्रात आलेली आहेत. त्यात मिळकतीचे बनावट मूल्रांकन सादर करून बँकेची फसवणूक केल्या आरोपावरून कर्ज उपसमिती सदस्र, बँकेचे संचालक मंडळ सदस्रांसह आणखी सहा जणांच्रा विरोधात चिंचवड पोलीस ठाण्रात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

याप्रकरणी पिंपरी चिंचवड येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्कालीन संचालक नवनीत सुरपुरिया, यज्ञेश चव्हाण, आशुतोष लांडगे, जयदीप वानखेडे यांना अटक केली आहे. या गुन्ह्यात शेळकेचे नाव निष्पन्न झाल्याने पिंपरी पोलिसांनी नगरमध्ये तळ ठोकून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत डॉ. शेळके याला सोमवारी ताब्यात घेतले होते.

त्याला अटक केली असून पोलीस त्याच्याकडे चौकशी करणार आहे. दरम्यान, डॉ. शेळके याला शहर सहकारी बँक फसवणूक प्रकरणी नगर आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्याला कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तीन गुन्ह्यात वर्ग केल्यानंतर आता पिंपरी चिंचवड गुन्ह्यात त्याचे नाव निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यात वर्ग करून घेण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या