Friday, April 26, 2024
Homeनगरटोमॅटोवर माव्याचा प्रादुर्भाव रोखणे हाच सीएमव्हीवर उपचार- डॉ. रेड्डी

टोमॅटोवर माव्याचा प्रादुर्भाव रोखणे हाच सीएमव्हीवर उपचार- डॉ. रेड्डी

वीरगाव |वार्ताहर| Virgav

माव्याद्वारे प्रसारित होणारा सीएमव्ही (कुकूंबर मोझँक व्हायरस) हा टोमॅटोवरील विषाणूजन्य आजार पिकांसाठी घातक

- Advertisement -

असून संशोधनाअंती यावर उपचार शोधण्याचे प्रयत्न सुरु असले तरी माव्याचा प्रादुर्भाव रोखणे हाच या रोगावरील प्रभावी इलाज असल्याचे प्रतिपादन बेंगलोरचे वनस्पती विषाणूतज्ञ व वनस्पती रोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. कृष्णा रेड्डी यांनी केले.

अकोले तालुक्यातील वीरगावच्या विश्व हायटेक नर्सरीला भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी टोमॅटो पिकाला घातक ठरलेल्या सीएमव्ही रोगाबाबद सविस्तर चर्चा केली.यावेळी त्यांचेसमवेत अकोले तालुका कृषी अधिकारी प्रवीणकुमार गोसावी, सिजेंटाचे ऍग्रोनाँमी प्रमुख डॉ. रमेश मोहाळे, दिनेश भोईटे, शशिकांत कराळे, विश्व हायटेक नर्सरीचे संचालक नानासाहेब थोरात, विरेंद्र थोरात, प्रा. शांताराम गजे, शिवाजी पाटोळे हे उपस्थित होते.

विश्वहायटेक नर्सरी बघितल्यानंतर मी भारावून गेलो आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि आदर्श व्यवस्थापनाने याठिकाणी रोपांचे होणारे सृजन महाराष्ट्र आणि बाहेरच्या राज्यातही हरितक्रांतीला हातभार लावीत आहे.ग्रामीण भागात इतके अत्युच्च प्रतीचे तंत्रकौशल्य आणि व्यवहारकौशल्य असू शकते हे चकित करणारे आहे. विश्व हायटेक नर्सरी शेतकर्‍यांचे पर्यटन स्थळ असून माझ्या चिरस्मरणात ही नर्सरी राहील अशी शाबासकीही डॉ.कृष्णा रेड्डी यांनी दिली.

टोमॅटोवरील सीएमव्ही बाबद माव्यापासून पिकाचे संरक्षण ही महत्वपुर्ण बाब असल्याचे ते म्हणाले. टोमॅटोवरील सीएमव्ही व्हायरस प्रतिबंधात्मक उपायांसाठी बॉर्डर क्रॉप म्हणून मका लावणे, चिकट सापळे लावणे किंवा क्रॉप कव्हर आदी उपाययोजना आवश्यक ठरतील. एका पिकावर लगेच दूसरे पिक घेतल्याने जमिनीला विश्रांती मिळत नाही,

पिक फेरपालट गरजेचा असून टोमॅटोनंतर शेंगावर्गीय किंवा द्विदल वर्गीय पिके घ्यावीत, बनावट व चुकीचे किडनाशक बाजारात मिळते आणि आमचे औषध विषाणूला मारते असा चुकीचा दावा केला जातो परंतु विषाणू कशानेही मरत नाही माव्याचा प्रादुर्भाव रोखून या विषाणूचे व्यवस्थापन करण्यात येते.जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होत असून तो सुधारणे गरजेचे असून सकस जमिनच आता यापुढे पिकांचे रोगापासून रक्षण करेल असेही डॉ. कृष्णा रेड्डी म्हणाले.

यावेळी विश्व हायटेक नर्सरीचे संचालक विरेंद्र थोरात आणि कृषी अधिकारी प्रवीणकुमार गोसावी यांनीही टोमॅटो त्याचप्रमाणे इतर पिकांचेरोगांपासून संरक्षणाबाबद डॉ. रेड्डी यांचेशी चर्चा केली.

विश्व हायटेक नर्सरीत रोपांची निर्मिती इंन्सेक्ट नेटचा वापर करुन शेडनेटमध्ये केली जाते. त्यामुळे रोपांवर माव्याचा प्रादुर्भाव होत नाही. हायजेनिक पाँलिहाऊस, किड-रोग नियंत्रण कक्ष, पाण्याचे उत्तम व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाने कुशल कर्मचारी यामुळे निरोगी रोपनिर्मितीस मदत होते. डॉ. कृष्णा रेड्डी आणि सिजेंटाचे डॉ. रमेश मोहाळे यांनी नर्सरीस भेट देऊन मार्गदर्शन केले याचे समाधान आहे. मान्यवरांकडून ‘अ’ वर्गाच्या मिळालेल्या शाबासकीमुळे भविष्यात अधिक उत्तमोत्तम काम करण्याची प्रेरणा मिळाली.

-विरेंद्र थोरात, संचालक, विश्व हायटेक नर्सरी, वीरगाव

अकोले तालुक्यात मागील वर्षी 650 हेक्टरचे दरम्यान टोमॅटो पिकाची लागवड झाली होती. त्यापैकी साधारण 150 हेक्टर क्षेत्रावर सीएमव्ही विषाणूंचा प्रादुर्भाव झाला. भविष्यातही या विषाणूजन्य रोगाचा मुकाबला शेतकर्‍यांना प्रभावाने करता यावा म्हणून डॉ. कृष्णा रेड्डी यांची मार्गदर्शिका सर्व टोमॅटो उत्पादकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल.

-प्रवीणकुमार गोसावी, अकोले तालुका कृषी अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या