Friday, April 26, 2024
Homeनगरडॉ. राठोड यांच्या आवाजाचे नमुने घेण्यास खंडपीठाची स्थगिती

डॉ. राठोड यांच्या आवाजाचे नमुने घेण्यास खंडपीठाची स्थगिती

अहमदनगर|Ahmedagar

पोलीस कर्मचार्‍यासोबत झालेल्या संभाषणाची सत्यता पडताळणी करण्यासाठी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांना

- Advertisement -

स्वत: च्या आवाजाचा नमुना देण्याबाबत जिल्हा न्यायालयाने आदेश दिले होते. या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली असून पुढील सुनावणी 4 जानेवारी 2021 रोजी होणार असल्याची माहिती अ‍ॅड. नितीन गवारे यांनी दिली.

नेवासा पोलीस ठाण्याचे कर्मचारी संभाजी गर्जे आणि तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकार्‍यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले होते. अधीक्षक पाटील यांनी क्लीपची सत्यता पडताळणीसाठी राठोड यांच्या आवाजाचे नमुने घेण्याची कार्यवाही सुरू केली. मात्र, राठोड यांनी त्यास नकार दिला होता. त्यानंतर अधीक्षक पाटील यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेत तसा आदेश राठोड यांना द्यावा अशी मागणी केली होती. अधीक्षक पाटील यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी झाली. अधीक्षक पाटील यांनी दाखल केलेला अर्ज मंजूर करीत डॉ. राठोड यांना आवाजाचे नमुने देण्याबाबतचा आदेश दिला होता. या आदेशाला डॉ. राठोड यांनी अ‍ॅड. नितीन गवारे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावर बुधवारी न्या. विभा कंकणवाडी यांच्यासमोर सुनावणी झाली.

डॉ. राठोड यांची चौकशी करण्याचे अधिकार जिल्हा पोलीस अधीक्षकांना नाही. तसेच एखादे पत्र आल्यास त्यावर आदेश करण्याचे अधिकार जिल्हा न्यायालयाला नाहीत, असा युक्तीवाद डॉ. राठोड यांच्यावतीने अ‍ॅड. गवारे यांनी केला. तो ग्रह्या धरत न्या. कंकणवाडी यांनी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या