Thursday, April 25, 2024
Homeनगरराहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांच्या खाती 30 लाख वर्ग

राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांच्या खाती 30 लाख वर्ग

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील सन 2019-2020 या सालात नियमीत कर्ज परतफेड करणार्‍या शेतकरी सभासदांना डॉ. पंजाबराव देशमुख पीक प्रोत्साहन योजनेअंतर्गत व्याज सवलत 3 टक्के व 1 टक्के अनुदान तालुक्यातील 108 विविध कार्यकारी सेवा संस्थेतील 1 हजार 411 शेतकरी सभासदांची रक्कम रु 30 लाख 24 हजार 366 रुपये सभासदांच्या खाती वर्ग करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक अरुण तनपुरे यांनी दिली.

- Advertisement -

जिल्हा बँकेचे 35 हजार 879 तर राष्ट्रीयीकृत बँकांचे जवळपास 19 हजार शेतकरी पात्र ठरतील. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून व राष्ट्रीयीकृत बँकेकडून घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना दरवर्षी पंजाबराव देशमुख व्याजसवलत योजनेतून व्याजमाफी दिली जाते. परंतु गेल्या 3 वर्षांपासून प्रलंबित असलेली तालुक्यातील 108 विविध कार्यकारी सेवा संस्थेतील 1411 शेतकरी सभासदांना 30 लाख 24 हजार 366 रुपये त्यांचे खात्यावर वर्ग करण्यात आली असल्याची माहिती संचालक अरुण तनपुरे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या