Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकडॉ. नितीन करमळकर आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु

डॉ. नितीन करमळकर आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु पदाचा कार्यभार सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी स्विकारला. मा. कुलपती कार्यालयाने आदेशित केल्यानुसार आरोग्य विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरु पदाचा कार्यभार डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाचा मानदंड देऊन डॉ.नितीन करमळकर यांच्याकडे सुपूर्द केला.

- Advertisement -

या प्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ.करमळकर यांनी सांगितले की, आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा कार्यभार स्विकारतांना मला आनंद होत आहे. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यात असून आरोग्य क्षेत्राशी निगडीत लोकांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आहे. कोविड-19 च्या काळात विद्यापीठाने व विविध आरोग्य संस्थांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाबरोबर विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधनाचे कामकाज विद्यापीठातून यापुढे घडावे यासाठी मी प्रयत्नशील राहील असे त्यांनी सांगितले.

डॉ. नितीन करमळकर सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु आहेत. त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून भूगर्भशास्त्रात बीएस्सी केल्यानंतर त्यांनी एमएस्सीसाठी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला. पुढे ‘पेट्रोग्राफी जिओकेमेस्ट्री ऑफ अल्ट्रामफाइट्स फ्रॉम पार्टस ऑफ लडाख हिमालाय (विथ रेफ्रन्स टू क्रोमॅटिक मिनरलायझेशन)’ या विषयात पीएचडी प्राप्त केली. याच विषयाशी निगडीत बाबींवर त्यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनीत तसेच जर्मनीत संशोधन केले. डॉ. करमळकर यांना उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापन, प्रशासन, तसेच संशोधनाचा मोठा अनुभव आहे.

पर्यावरण, भूगर्भशास्त्र, भूरसायनशास्त्र हे त्याचे संशोधनाचे विषय. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमधून त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. तसेच, परदेशातील काही संस्थांबरोबर सध्या संशोधन प्रकल्प सुरू आहेत. पाषाण हा त्यांचा अभ्यासाचा विषय असून, विविध प्रकारच्या अधिवासात आढळणार्‍या पाषाणांवर त्यांचे संशोधन सुरू आहे.

त्यांच्या कामाचा विविध संस्थांकडून आजवर गौरव करण्यात आला. त्यांचे विद्यार्थी आज वेगवेगळया देशांना मोठ्या पदांवर आहेत. त्याचे शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कार्य असून ते आरोग्य विद्यापीठाच्या वाटचालीत त्यांची भूमीका महत्वाची असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या