Saturday, April 27, 2024
Homeनगरडॉ. नीलेश शेळके विरोधात दोषारोपपत्र दाखल

डॉ. नीलेश शेळके विरोधात दोषारोपपत्र दाखल

अहमदनगर|Ahmedagar

शहर सहकारी बँकेच्या बोगस कर्जप्रकरणी डॉ. नीलेश विश्‍वास शेळके विरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. या तीन गुन्ह्यांचे स्वतंत्र दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी दिली. तीनही दोषारोपपत्रामध्ये डॉ. शेळके याच्याविरूद्ध दोषारोप ठेवण्यात आले आहेत.

- Advertisement -

हॉस्पिटलमधील मशनरी खरेदी करण्यासाठी अहमदनगर शहर सहकारी बँकेने 17 कोटी 25 लाख रुपयांचे बोगस कर्ज वाटप केल्याने डॉ. शेळके व बँकेचे संचालक मंडळासह 25 जणांविरुद्ध फसवणुकीचे तीन गुन्हे कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. राहुरी येथील डॉ. रोहिणी भास्कर सिनारे, श्रीरामपूर येथील डॉ. उज्ज्वला रवींद्र कवडे, नगरमधील डॉ. विनोद अण्णासाहेब श्रीखंडे या तिघांनी फिर्याद नोंदवली असून, बनावट कागदपत्रांद्वारे या तिघांची प्रत्येकी 5 कोटी 75 लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याला शोधण्यासाठी पुणे येथे गेलेल्या पोलिसांच्या पथकाला डॉ. शेळके हाती लागला होता. त्या गुन्ह्यात त्याची चौकशी केल्यानंतर त्याला शहर सहकारी बँक फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली होती. फसवणूकीचे तीन गुन्हे दाखल असल्याने त्याला तीनही गुन्ह्यात वर्ग करण्यात आले होते. डॉ. शेळके याला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याविरूद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याची तयारी गुन्हे शाखेने केली.

तीन वेगवेगळे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सध्यातरी डॉ. शेळके हा अटक असल्याने त्याच्याविरूद्ध दोषारोप ठेवण्यात आले असल्याचे उपअधीक्षक सोनवणे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या