Wednesday, April 24, 2024
Homeनगरडॉ. नवले यांना धमकी; सर्वपक्षीय संघटनांचे तहसिलदारांना निवेदन

डॉ. नवले यांना धमकी; सर्वपक्षीय संघटनांचे तहसिलदारांना निवेदन

अकोले |प्रतिनिधी| Akole

डॉ. अजित नवले यांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍यांचा बंदोबस्त करा या मागणीसाठी सर्वपक्षीय संघटना व शेतकरी नेते यांच्यासह

- Advertisement -

अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

दिल्ली येथे होत असलेल्या शेतकरी आंदोलनास सरकार जाणीवपूर्वक बदनाम करून दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे व या आंदोलनात सहभागी शेतकरी नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहे.

अकोले तालुक्याचे भूमिपुत्र व अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. या समाजकंटकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी उपस्थित कार्यकर्त्यांनी केली.

यावेळी ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत, भाकपचे नेते कारभारी उगले, बी. जे. देशमुख, अगस्ती कारखाना संचालक महेशराव नवले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, काँगेसचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, राष्ट्र सेवा दलाचे विनय सावंत, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप शेणकर, संभाजी ब्रिगेडचे राज्य सचिव डॉ. संदीप कडलग, समन्वयक सोमनाथ नवले, शेतकरी संघटनेचे सुरेश नवले, शिवसेनेचे नेते प्रदीप हासे, मनसे तालुकाध्यक्ष दत्ता नवले, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी नेहे, संपत कानवडे, शहराध्यक्ष अमित नाईकवाडी, जादूगार हांडे, जिजाऊ ब्रिगेडच्या सौ. हांडे, किरण चौधरी, सुभाष येवले, नानासाहेब दळवी, विकास बंगाळ आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या