Thursday, April 25, 2024
Homeजळगावप्राचार्य डॉ.किसनराव पाटील वाडःमय पुरस्कार घोषित

प्राचार्य डॉ.किसनराव पाटील वाडःमय पुरस्कार घोषित

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

महाराष्ट्रातील ख्यातनाम संशोधक, अभ्यासक, साहित्यिक प्राचार्य डॉ.किसनराव पाटील यांचे 2 मार्च 2021 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

- Advertisement -

त्यांच्या स्मर्णार्थ डॉ.किसनराव पाटील यांच्या ज्ञानपरंपरेतील विद्यार्थी व कुटुंबियांकडून सरांच्या सृती कायम राहाव्यात या हेतूने महाराष्ट्र साहित्य परिषद, जळगाव शाखेमार्फत प्राचार्य डॉ.किसनराव पाटील राज्यस्तरीय वाडःमय पुरस्कार व प्राचार्य डॉ.किसनराव पाटील खान्देशस्तरीय वाडःमय पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली.

प्राचार्य डॉ.किसनराव पाटील राज्यस्तरीय वाडःमय पुरस्कार पुणे येथील लेखक, संपादक मनोहर सोनवणे यांच्या ब्रँड फॅक्टरी या कथासंग्रहास तर प्राचार्य डॉ.किसनराव पाटील खान्देशस्तरीय वाडःमय पुरस्कारासाठी कापूसवाडी,ता.जामनेर येथील लेखक युवराज पवार यांच्या ‘शिकार’ या कथासंग्रहाला घोषित करण्यात आला आहे.

राज्यस्तरीय पुरस्कार अकरा हजार रोख, स्मृती चिन्ह, शाल श्रीफळ व खान्देशस्तरीय पुरस्कार रोख पाच हजार, स्मृती चिन्ह, शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 12 जून रोजी स्व. डॉ.किसनराव पाटील यांचा जन्मदिवस आहे, त्यानिमित्ताने आज या दोन्ही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षी राज्यस्तरीय वाडःमय पुरस्कार हा कथा या वाडःमय प्रकारासाठी ठेवण्यात आलेला होता तर खानदेश स्तरीय पुरस्कारासाठी सर्वच वाडःमय प्रकारांतून प्रवेशिका मागवण्यात आलेल्या होत्या.

दोन्ही पुरस्कारांसाठी संबंध महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद लाभला. आलेल्या प्रवेशिकांचे अवलोकन, परीक्षण सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक प्रा.डॉ.म.सु.पगारे व सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी अशोक कोतवाल यांनी केले. लवकरच पुरस्कार वितरणासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषद, जळगाव शाखेतर्फे आयोजन करण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र साहित्य परिषद जळगाव शाखाअध्यक्ष प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, कार्याध्यक्ष प्रा.डॉ. सत्यजित साळवे यांनी कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या