Wednesday, April 24, 2024
Homeजळगावडॉ.जगदीश पाटील मराठी विषयात नेट उत्तीर्ण

डॉ.जगदीश पाटील मराठी विषयात नेट उत्तीर्ण

भुसावळ – Bhusawal

येथील संतधामजवळील दूर्गा कॉलनीतील (Durga Colony) रहिवासी तथा बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे (Marathi Language Study Board of Balbharati) सदस्य डॉ.जगदीश लक्ष्मण पाटील (Dr. Jagdish Laxman Patil) यांनी युजीसीमार्फत घेण्यात आलेली राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET Exam) (नेट) 2022 मराठी (Marathi) विषयात उत्तीर्ण केली आहे.

- Advertisement -

Visual Story या अभिनेत्रीने कमी वयात मिळविली अफाट लोकप्रियता…

केंद्र सरकारच्या (Central Govt) शिक्षण मंत्रालयांतर्गत (Ministry of Education) असणाऱ्या यूजीसीमार्फत एनटीएतर्फे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षा नुकतीच पार पडली. त्यात मराठी विषयाचा निकाल 5.82 टक्के लागला.

सदर परीक्षेत संपूर्ण भारतातून मराठी विषयासाठी 3 हजार 829 विद्यार्थ्यांपैकी 223 विद्यार्थी पात्र ठरले.

त्यात भुसावळ येथील डॉ.जगदीश पाटील यांचा समावेश आहे. त्यांनी दहा वर्षांपूर्वी श्रीसंत एकनाथांची भक्ती या विषयावर पीएच.डी. पदवी संपादन केली होती. त्यानंतर आता राष्ट्रीय स्तरावरील यूजीसी नेट परीक्षा मराठी विषयात ते उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे देशभरातील विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरील मराठी विषयाच्या प्राध्यापक पदासाठी ते पात्र ठरले आहेत. अत्यंत बिकट परिस्थितीत मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Visual Story या अभिनेत्रीने कमी वयात मिळविली अफाट लोकप्रियता…

- Advertisment -

ताज्या बातम्या