दुचाकीस्वार दांपत्याला वाचविण्याच्या प्रयत्नात खा.डॉ.हिना गावीत यांच्या गाडीचा अपघात

jalgaon-digital
1 Min Read

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

नंदुरबार येेथील एका कार्यक्रमाला जात असतांना एका दुचाकीस्वार दांपत्याला (bike riding couple) वाचविण्याच्या (trying to save) प्रयत्नात खा.डॉ.हिना गावीत (Dr. Hina Gavit) यांची गाडी दुभाजकावर (car accident) आदळुन अपघात झाल्याची घटना घडली आहे.यात खा.डॉ.हिना गावीत यांना किरकोळ दुखापत (Minor injury) झाली आहे.

याबाबत प्राथमीक माहिती अशी कि,काल दि.7 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजेच्या स्ाुमारास नंदुरबार शहरात असलेल्या एका कार्यक्रमाल जात असतांना शहरातील करण चौफुली जवळ असलेल्या अ‍ॅन्टी करप्शनच्या ऑफिस जवळ खा.डॉ.हिना गावीत यांची गाडी आली असता अचानक दुचाकी भरधाव आली.त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात असतांना गाडी दुभाजकावर जावुन धडकली यात खा.डॉ.हिना गावीत, सुभाष पानपाटील, महेंद्र पाटील, जितेंद्र पाटील, मिलींद मोहिते, प्रतिक जैन यांना किरकोळ दुखापत झाली.

दरम्यान अशातच दुचाकीला कारने धडक दिल्याने वृध्द दांपत्य जखमी झाले. जखमी अवस्थेत खा.डॉ.हिना गावीत व त्यांच्या सहकार्‍यांनी अ‍ॅम्बुलंसला कळवुन दांपत्याला रूग्णालयात दाखल केले. त्यांनतर खा.डॉ.हिना गावीत यांच्यावर शहरातील तुलसी हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात आले. खा.डॉ.हिना गावीत यांना किरकोळ दुखापत झाली आहे.आता त्यांची प्रकृती चांगली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *