Thursday, April 25, 2024
Homeनगरडॉ. राठोड यांची अमरावतीत नियुक्ती

डॉ. राठोड यांची अमरावतीत नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी) –

डिझेल छापा प्रकरण, कथित ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेले तत्कालिन अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांना

- Advertisement -

शासनाने अमरावती येथे नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती दिली आहे. गृह विभागाने त्यांच्या बदली बाबतचे आदेश काढले आहे.

डॉ. राठोड यांची नांदेड येथून बदली झाल्यानंतर त्यांनी 5 ऑक्टोबर रोजी नगर येथे अपर अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करून जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध धंद्यावर कारवाई केले होते. त्यांच्या पथकाने नगर शहरात बनावट डिझेलवर केलेली कारवाई चांगलीच चर्चेचा विषय ठरली होती. ही कारवाई करणार्‍या पथकातील कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे.

दरम्यान डॉ. राठोड हे एका पोलीस कर्मचार्‍यासोबत आर्थिक व्यवहाराबाबत चर्चा करत असल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ही क्लिपही चांगलाच चर्चेचा विषय ठरली. याच दरम्यान डॉ. राठोड यांची शासनाने नगरमधून तडकाफडकी बदली केली. बदलीनंतर डॉ. राठोड यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांनी मॅटमध्ये तक्रार केली होती. यावर मॅटने निर्णय देत आठ दिवसात नियुक्ती देण्याचे आदेश दिले होते. मॅटच्या आदेशानुसार शासनाने त्यांना नियुक्ती दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या