Friday, April 26, 2024
Homeनाशिकआरोग्य विभागात करोनाचा शिरकाव; डॉ. नागरगोजे, डॉ. पलोड करोना पॉझिटिव्ह

आरोग्य विभागात करोनाचा शिरकाव; डॉ. नागरगोजे, डॉ. पलोड करोना पॉझिटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी

करोना नियंत्रणाची जबाबदारी ज्यांच्यावर होती तेच आता बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे नाशिक शहरात करोना प्रादुर्भावामुळे चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पलोड यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने महापालिकेत खळबळ उडाली आहे….

- Advertisement -

सध्या दोघांचा कार्यभार डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे समजते. महापालिकेच्या मुुख्यालयाला करोनाचा विळखा पडायला सुरुवात झाली आहे.

महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील कोरोना योध्दा म्हणून ओळख असलेले डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि डॉ. आवेश पलोड यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांचे रिपोर्ट गुरुवारी (दि. २५) पॉझिटिव्ह आले. काही दिवसांपूर्वीच महापालिका मुख्यालयातच कोणतीही लक्षणे नसणारे १४ सुपर स्प्रेडर्स आढळले होते.

वैद्यकीय विभागातील अधिकारी, डॉक्टर दिवस-रात्र कार्यरत असतानाच आता वैद्यकीय अधीक्षक, अधिकारी, सहायक वैद्यकीय अधिकारी यांचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय विभागाला धक्का बसला आहे.

शहरातील करोना नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांची जबाबदारी सध्या या वैद्यकीय अधिकार्‍याकडे आहे. मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यांसह अन्य वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संपर्कात हा अधिकारी आल्याने वैद्यकीय विभागाची डोकेदुखी वाढली आहे. संबंधित अधिकार्‍यास लक्षणे नसली, तरी ते सध्या होम क्वारंटाइन झाले असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या