Thursday, April 25, 2024
Homeजळगावक्रांतिज्योती सावित्रीमातेच्या नावाचा पुरस्कार व्रतस्थ समाजकार्यासाठी चिरनुतन चैतन्य देणारा-महापौर जयश्री महाजन

क्रांतिज्योती सावित्रीमातेच्या नावाचा पुरस्कार व्रतस्थ समाजकार्यासाठी चिरनुतन चैतन्य देणारा-महापौर जयश्री महाजन

जळगाव – jalgaon

क्रांतिज्योती सावित्रीमातेच्या नावाचा पुरस्कार दीनदलितांच्या सेवेसाठी व व्रतस्थ समाजकार्यासाठी चिरनुतन चैतन्य देणारा ” असे भावोद्गार महापौर जयश्रीताई महाजन यांनी काढले. भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव व देवकाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श समाज शिक्षिका पुरस्कार महिला शिक्षण दिनाच्या औचित्याने देण्यात आला.

- Advertisement -

शिक्षिका ते जळगाव महानगरच्या महापौर हा अलौकिक जीवन प्रवास व जळगावच्या विकासाचा ध्यास घेऊन अल्पावधीत सर्वांगीण विकास केल्याची दखल घेऊन महापौर तथा माध्यमिक शिक्षिका सौ.जयश्री सुनील महाजन यांना विशेष आदर्श क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाज शिक्षिका पुरस्कार मंगळवार दि.4 जानेवारी 2022 रोजी महापौर दालनात शशिकांत हिंगोणेकर (सेवानिवृत्त विभागीय सचिव म.रा.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर विभाग लातूर) यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना महापौर महाजन बोलत होत्या.

पुरस्कारात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी कार्य दर्शविणारे आकर्षक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच शाल,श्रीफळ आणि ग्रंथ देण्यात आले.याप्रसंगी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जिल्हा प्रमुख विजय लुल्हे, देवकाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष कलाशिक्षक सुनील दाभाडे, कुमूद प्रकाशनाच्या प्रकाशिका सौ.संगीता माळी व मेहरुणच्या जय दुर्गा प्राथमिक विद्यालयाचे उपशिक्षक महेश बच्छाव उपस्थित होते. आपल्या सत्काराला उत्तर देतांना महापौर जयश्री महाजन म्हणाल्या की,” माननीय हिंगोणेकर साहेबांच्या हस्ते झालेला सत्कार हा ऐतिहासिक असून मला शैक्षणिक कार्यासाठी दिपस्तंभासमान अक्षय ऊर्जा देत राहील.

विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आजोबा आजी अभावी संस्कार मिळणे दुरापास्त झाले आहे अशावेळी संस्कारांचे बीजारोपण दोन्ही पिढ्यांमध्ये पुस्तक भिशी करीत असल्याबद्दल त्यांनी पुस्तक भिशी जिल्हा प्रमुख विजय लुल्हे व सहकाऱ्यांचे कौतूक केले. पुस्तक भिशी संकल्पना व कार्यवाहीबाबत लुल्हे यांच्याशी महापौरांनी चर्चा करून माहिती करून घेतली. पुस्तक भिशी राबवित असलेल्या शैक्षणिक,सामाजिक व साहित्यिक उपक्रमांचीही त्यांनी प्रशंसा केली.

हिंगोणेकर साहेबांनी ” महापौरांची डायरी ” लिहून राजकिय सत्ताकाळात केलेल्या मुल्यात्मक सामाजिक सुधारणांच्या कटू गोड अशा संस्मरणीय आठवणी लिहिण्याचे महापौरांना सांगताच मी निश्चित प्रयत्न करेन असे विनम्रपणे महापौरांनी आश्वासन दिले. जिल्हा मध्यवर्ती बँकेत बिनविरोध संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल महापौर जयश्री महाजन यांचा भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी तर्फे हृद्य सत्कार जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी शाल, श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन केला.तसेच कुमूद प्रकाशनातर्फे सौ.संगीता माळी यांनी ग्रंथ भेट देऊन महापौर यांचा भावपूर्ण सत्कार केला.

याप्रसंगी सुनील महाजन, आदर्श शिक्षक सागर झांबरे सर, महेश तायडे सर, महापौर यांचे स्वीय सहाय्यक ललित धांडे उपस्थित होते. भिशीचे सक्रीय सभासद महेश बच्छाव यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या