Saturday, April 27, 2024
Homeनाशिकडॉ. आनंद पाटील विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी

डॉ. आनंद पाटील विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी

नाशिक । Nashik

मुंबई पत्रकार परिषद मध्ये 15 वे विद्रोही साहित्य संमेलन नाशिक च्या अध्यक्ष पदी कथाकार, आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक तुलनाकार ,समीक्षक डॉ. आनंद पाटील ( कोल्हापूर) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी व कार्य. सेक्रेटरी यशवंत मकरंद, राज्य कार्यकारी संघटक किशोर ढमाले, नाशिक संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशीभाऊ उन्हावणे, मुख्य संयोजक राजू देसले यांनी जाहीर केले.

२५ व २६ मार्च ला १५वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे केटीएचएम कॉलेजच्या प्रांगणात होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे डॉ. आनंद पाटील यांची निवड निवड झाली आहे. या संमेलनाच्या उघाट्न प्रसंगी जागतिक हवामान बदलावर जनजागृती करणारी पर्यावरणवादी कार्यकर्ती व दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाम भुमिका घेणारी ग्रेटा थनबर्ग यांच्याशी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने संपर्क सुरू आहे.

दरम्यान यापूर्वी विद्रोही संमेलनांचे बाबुराव बागुल, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. अजीज नदाफ, डॉ. आ.ह. साळुंखे, मा. वाहरू सोनवणे, उर्मिला पवार, कॉ. तारा रेड्डी, संजय पवार, जयंत पवार, प्रतिभा अहिरे, डॉ. श्रीराम गुंदेकर, तुळसी परब, आत्माराम कनीराम राठोड, विमल मोरे, डॉ प्रल्हाद लुलेकर यांसारख्या सर्जनशील साहित्यिकांनी अध्यक्षपद भूषविले आहे.

डॉ. आंनद पाटील यांच्याविषयी…

डॉ. आनंद पाटील हे आशियातील एक आघाडीचे सांस्कृतिक, तुलनाकार, ग्रामीण (मराठी- इंग्रजी) असून लेखक त्यांचा निर्भीडपणा व त्यांच्या अफाट आंतरवविद्याशाखीय व्यासंगामुळे ओळखले जातात. वैचारिक, ललित, प्रवासवर्णन, कथा, नाटक इत्यादि सर्व पद्धतीचे लेखन करून त्यांनी मराठी, ग्रामीण व इंग्रजी साहित्यात मोलाची भर घातली आहे. कागूद’ आणि ’सावली’ या त्यांच्या दोन लघुकादंबर्‍या फार गाजल्या. रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालये व गोवा विद्यापीठ इंग्रजी विभागाततसेच नवी दिल्ली विद्यापीठ, उत्तर गुजरात विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ या विद्यापीठांचे ते अभ्यागत प्राध्यापक होते.

साहित्य निर्मिती—-

लघुकथा, कादंबरी,वैचारिक लेखन, प्रवास वर्णन अशा विविध साहित्य प्रकारांत आनंद पाटील यांनी मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती केली आहे. ‘कागूद’ (1982) ही गिरणी कामगारांच्या जीवनावरील ही पहिली लघुकादंबरी ठरली. त्यानंतर इच्छामरण (2008) ही कादंबरी लिहिली. युरोप (1986), बांगला देश (1991), अमेरिका (1996), चीन (2001), हॉलंड (2002), बँकॉक (2003), द. कोरिया (2004).

प्रकाशित पुस्तके

डॉ. आनंद पाटील यांनी आजवर इच्छामरण: (2008), कणसं आणि कडबा कागूद आणि सावली : 2 लघुकादंबर्‍या. मुंबई, मौज प्रकाशन (1986). इ. 3 कादंबर्‍या, खंडणी (2011), दावण (1998) वगैरे 6 कथा संग्रह, परदेशी 6 परिक्रमा, पाटलाची लंडनवारी,(1999) इ. 2 प्रवास वर्णने, आनंदपर्व: तौलनिक साहित्य आणि सांस्कृतिक समीक्षा, काही लोकल काही ग्लोबल, आनंद ग्रंथसागर,

तुळव: तौलनिक निबंध, तौलनिक साहित्य: नवे सिद्धांत आणि उपयोजन इ. सात तौलनिक साहित्यातील ग्रंथ तसेच ग्रंथानी रचलेला महापुरुष: यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राला माहित नसलेले सम्राट शिवाजी सह्याद्री इ. तीन चरित्रे व तरवा: (2005), टीकावस्त्रहरण, ब्रिटीश बाँबे आणि पोर्तुगीज गोव्यातील वाङमय, समग्र बा.सी. मर्ढेकर: तौलनिक सांस्कृतिक समीक्षा, समग्र शेक्सपिअर:

तौलनिक सांस्कृतिक समीक्षा इ. 8 संस्कृतिक समीक्षत्मक ग्रंथ धर्माचा वैदिक वाङमयातील उदय आणि विकास, डॉ.पंजाबराव देशमुख – प्रबंध इ. 2 अनुवाद ग्रंथ, संगीत ऑटोमॅटिक आसूड सारखे नाटक आणि इन सर्च ऑफ माय कोल्हापूर, उद्धव शेळके: मेकर्स ऑफ इंडियन लिटरेचर, परस्पेक्टिव्ह्ज अ‍ॅन्ड प्रोग्रेशन: एक्सेस इन कंम्परिटिव्ह लिटरेचर, रिव्हिजनिंग कम्पॅरिटिव्ह लिटरेचर अन्ड कल्चर (2011) इ. 7 इंग्रजी ग्रंथ लिहिले आहेत.

साहित्य समीक्षा : 1) आनंद पर्व: तौलनिक साहित्य आणि सांस्कृतिक समीक्षा (2) पाटलाचा कड : समग्र समीक्षा (3) पाटलाची लंडनवारी.

- Advertisment -

ताज्या बातम्या