Wednesday, April 24, 2024
Homeजळगावजामनेर : नांद्रा येथे डबल मर्डर

जामनेर : नांद्रा येथे डबल मर्डर

जळगाव – Jalgaon

जामनेर तालुक्यातील नांद्रा (प्र.लोहारा) येथे वडील आणि लहान भावाचा खून झाल्याची घटना रात्री दीड च्या सुमारास घडली.

- Advertisement -

आनंदा कडू पाटील (६२) व भैय्या आनंदा पाटील अशी मृतांची नावे आहेत. निलेश आनंदा पाटील याने हे दोन्ही खून केले आहेत. पहूर पोलिस घटनास्थळी असून खुनाचे कारण समजू शकले नाही.

लोहारा ता.पाचोरा (वार्ताहर) –

गावात नेहमी नेहमी भांडण का करतोस? अशी विचारणा करणाऱ्या वडिलांना व लहान भावाला मोठ्या भावाने चाकूने वार करून खून केल्याची घटना येथून जवळच असलेल्या नांद्रा (प्र.) लो.ता.जामनेर येथे दि.११रोजी रात्री घडल्याने नांद्रासह परिसरात एकच खळबळ उडाली.

या बाबत पहूर पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नांद्रा(प्र.) लो.जामनेर येथील आनंदा कडू पाटील हे दोन्ही मुलांसह मोलमजुरी करून रहात होते. मोठा मुलगा निलेश आनंदा पाटील यास त्याचे वडील आनदा कडु पाटील व लहान भाऊ महेंद्र पाटील असे बोलले की तू गावात का नेहमी भाडण करतो याचे मोठा भाऊ निलेश यास वाईट वाटले व त्याने घरातुन चाकू आणाला व वडीलाना व लहान भाऊ अशाना पोटावर वार करून जिवेठार मारले असून पहुर पो स्टेला भाग 5 गुरन 201/20 भादवी क. 302 पमाणे गु्नहा दाखल केला आहे.

आरोपी अटक केला आहे, सदर घटनेचा पुढील तपास पहूर पो.स्टे.चे सहा.पो.निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय.अमोल देवरे, स.फौ.अनिल अहिरे, पो.कॉ.ईश्वर देशमुख, शशिकांत पाटील हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या