Saturday, April 27, 2024
Homeधुळेराज्य सबज्युनिअर नेटबॉल स्पर्धेत धुळ्याला दुहेरी मुकुट

राज्य सबज्युनिअर नेटबॉल स्पर्धेत धुळ्याला दुहेरी मुकुट

धुळे dhule । प्रतिनिधी

कोल्हापूर (Kolhapur) येथे घेण्यात आलेल्या 15 वी सबज्युनिअर राज्य नेटबॉल अजिंक्यपद (Subjunior State Netball Championship) स्पर्धेत धुळ्याला दुहेरी मुकुट (double crown) पटकाविला. मुलींच्या संघाने (girls’ team ) विजेतेपद (Championship) तर मुलांच्या संघाने (children’s team) उपविजेतेपद (runner-up) मिळविले.

- Advertisement -

जिल्ह्याच्या मुलींच्या संघाने मुंबई उपनगर, सांगली, नाशिक, अहमदनगर व भंडारा संघाना एकतर्फी हरवून प्रथम क्रमांकाचे विजेतेपदकासह चषक व सांघिक सुवर्णपदक मिळविले.

मुलींच्या संघात कर्णधार साक्षी पाटील, उपकर्णधार वैभवी खैरनार, दीपाली शिंदे, योगेश्वरी जाधव, हर्षाली पाटील, कल्याणी चव्हाण, रोशनी केदार, मोनाली राठोड, रिध्दी गावडे, पुर्वश्री वाघ (सर्व पिंपळादेवी विद्यालय, मोहाडी), रोशनी सुर्यवंशी (सेंट अँन्स् इंग्लिश स्कुल, धुळे), ऋतुजा वाघ (सेंट अँन्थनी इंग्लिश स्कुल, धुळे), व्यवस्थापक योगेश वाघ, प्रशिक्षक हर्षल भदाणे यांचा समावेश होता.

मुलांच्या संघाने सांगली, नाशिक, अहमदनगर व परभणी संघाना एकतर्फी हरवून द्वितीय क्रमांकाचे उपविजेतेपदकासह चषक व सांघिक सुवर्णपदक प्राप्त केले. मुलांच्या संघात कर्णधार गौरव पाटील, उपकर्णधार संकेत करंदीकर, भावेश गिरासे, कार्तिक रेवाळे, निलेश राजपूत, विवेक ठाकूर, विवेक पाटील, निवृत्ती गावडे, कृष्णा गावडे, गौरव पाटील, निरज साव, प्रेमराज देवरे, (सर्व पिंपळादेवी विद्यालय, मोहाडी), व्यवस्थापक अविनाश वाघ, प्रशिक्षक ऋत्विक ठाकूर, यांचा समावेश होता.

विजेता संघाचा माजी नगरसेवक विनायक शिंदे, जिल्हा क्रीडाधिकरी आसाराम जाधव, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर.व्ही. पाटील, क्रीडा महासंघाचे अध्यक्ष महेश घुगरी, सचिव पंढरीनाथ बडगुजर, राज्य खो-खो क्रीडा मार्गदर्शक गुरुदत्त चव्हाण, कला व क्रीडा शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष हेमंत भदाणे, सचिव राहुल पाटील यांनी अभिनंदन केले. राष्ट्रीय खेळाडू ऋत्विक ठाकूर व हर्षल भदाणे यांनी विजेत्या संघांना प्रशिक्षण दिले.

विजेत्या संघांचा गौरव शिक्षक नेते डी.एस. घुगरे, मनोहर परिट, राज्य अँम्युचेर नेटबॉलचे सहसचिव शाम देशमुख, पंच प्रमुख सतिष इंगळे, प्रा.मिनेश महाजन, संभाजी गायकवाड, विनय जाधव, योगेश वाघ, समिर शिकलकर, हैदरअली सैय्यद,अविनाश वाघ, महेंद्र गावडे, योगेश पांडे यांच्या हस्ते करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या