Friday, April 26, 2024
Homeधुळेन्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीचे धुळे जिल्ह्यासाठी 2600 डोस उपलब्ध

न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीचे धुळे जिल्ह्यासाठी 2600 डोस उपलब्ध

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

न्यूमोकोकल कॉन्जुगेट (झउत) या लसीचा नियमित लसीकरणामध्ये समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिल्या डोसचे 28 हजार 756 लाभार्थी अपेक्षित आहेत.

- Advertisement -

सहा आठवडे, 14 आठवडे व नऊ महिने या वयात हे डोस दिले जातील. लसीकरणासाठी दोन हजार सहाशे डोस उपलब्ध झाले असून त्याचा पात्र बालकांसाठी पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष पाटील, जिल्हा माता- बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी यांनी केले आहे.

जिल्हास्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र, बोरकुंड अंतर्गत रानमळा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरन्नुम पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पात्र लाभार्थ्यांना लस देवून या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

न्यूमोकोकल कॉन्जुगेट लससाठी ग्रामीण भागामध्ये प्रथम डोससाठी 28 हजार 756 अपेक्षित लाभार्थी आहेत. सार्वत्रिक लसीकरण मोहिमेंतर्गत मुलांना लसीचे तीन डोस 6 आठवडे, 14 आठवडे व 9 महिने या वयात दिले जातील. लसीकरणासाठी धुळे जिल्ह्याला एकूण 2600 डोस उपलब्ध झालेले आहेत.

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचार्‍यांना न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीबाबबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीचा जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थामध्ये पुरवठा करण्यात आलेला आहे.

न्यूमोकोकल आजार हा संसर्गजन्य असून तो एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीला खोकला किंवा शिंकताना संपर्कात आल्यामुळे पसरतो. त्यामुळे न्यूमोकोकल आजार सामाजिक आरोग्य समस्या आहे. भारतात 2010 मध्ये सुमारे एक लाख पाच हजार बाल मृत्यू हे न्यूमोनियाने झाल्याचा अंदाज आहे.

पाच वर्षाच्या आतील मुले आणि विशेष करून दोन वर्षाच्या आतील मुलांना हा आजार होण्याचा आणि त्यामुळे मृत्यूचा धोका सर्वात असतो.

रोग प्रतिकारशक्ती कमी असलेले मुले किंवा ज्यांना पूर्वी इन्फ्लूएंझा अथवा श्वसन मार्गाचा इतर विषाणूचा संसर्ग झाला आहे, अशा बालकांना हा आजार होण्याची शक्यता असते. न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस ही सहा आठवडे व त्या पुढील वयाच्या अर्भकांचे न्यूमोकोकल आजारापासून संरक्षण करते. ज्यामुळे त्यांना सर्वाधिक धोका असतो.

ही लस गंभीर न्यूमोकोकल आजार जसे न्यूमोनिया मेनिजायटिस आणि सेप्टिसेमियापासून लहान मुलांचे संरक्षण करते. न्यूमोकोकल कॉन्जुगेट सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत केंद्र सरकार व्दारा सर्व शासकीय आरोग्य संस्था,

प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील लसीकरण सत्रात पात्र बालकांना ही लस मोफत दिली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या