Thursday, April 25, 2024
Homeधुळेसपोनि पंजाबराव राठोडसह तिघे निलंबीत

सपोनि पंजाबराव राठोडसह तिघे निलंबीत

दोंडाईचा – Dondaicha – श.प्र :

येथील मोहन सदाशिव मराठे या तरुणाच्या संशयास्पद मृत्यूमुळे, निर्माण झालेला तणाव, समाजाच्या संतप्त भावना विचारात घेता याप्रकरणी

- Advertisement -

सहाय्यक पोलीस निरिक्षक पंजाबराव राठोड यांच्यासह तिघांना निलंबित करण्यात आले आहे. रात्री 9 वाजता पोलीस प्रशासन व जमावाचा समजोता झाल्यानंतर उशिराने अंत्यसंस्कार करण्यात आले.

बुधवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास मोहन मराठे या तरुणाचा मृतदेह आढळून आल्यापासून गेल्या 48 तासांपासून हे प्रकाण अंत्यत तापले आहे.

मराठा समाज संतप्त होवून रस्त्यावर उतरल्याने कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पोलीस प्रशासनाने जास्तची कुमक बोलवून दोंडाईचा शहरात बंदोबस्त वाढविल्याने शहराला छावणीचे स्वरुप आले आहे.

शहराला छावणीचे स्वरुप

एका चोरीच्या संशयावरुन ताब्यात घेतलेल्या मोहन मराठे या तरुणाचा झालेला मृत्यू संशयास्पद असून यासंदर्भात अनेक उलट-सुलट प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीत देखील तफावत असल्याने पोलिसांवरील संशय बळावला आहे. म्हणूनच या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी गुरुवारी सायंकाळीच सीआयडीकडे सोपविला.

अधीक्षक पंडीत, अप्पर अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्यासह अर्धाडझन पोलीस अधीकारी मोठ्या फौजफाट्यासह दोंडाईचात दाखल आहेत. दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करून चौका-चौकात बंदोबस्त लावल्या आहेत.

अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधीकार अनिल माने, रविकिरण दरोडे, अप्पर तहसीलदार सुदाम महाजन, गुन्हा अन्वेशन निरिक्षिक शिवाजी बुधवंत, शिरपूरचे पोलीस निरिक्षक हेमंत पाटील, थाळनेरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन साळुंखे, सांगवीचे अभिषेक पाटील यांच्यासह अधिकार्‍यांची उपस्थिती होती.

वेगात घडल्या घडामोडी

मिळालेल्या आदेशानुसार सीआयडीचे पथक गुरुवारी रात्रीच दोंडाईचात दाखल झाले. या विभागाचे अधीक्षक अजय देवरे यांनीही आज दुपारी दोंडाईचात येथे येवून तपासाचा आढावा घेतला.

अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव हे तर बुधवारपासूनच दोंडाईचात मुक्काम ठोकून आहेत. भल्या पहाटे 4 वाजता दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पंजाबराव राठोड यांची धुळे नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.

सायबर क्राईमचे निरिक्षक आनंद कोकरे यांना सकाळी 9 वाजता अधीक्षक पंडीत यांनी फोन करुन दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सुत्र घेण्यास सांगितले. त्यानुसार सकाळी 11 वाजता कोंकरे यांनी दोंडाईचात येवून पदभार घेतला.

समाज उतरला रस्त्यावर

या घटनेसंदर्भात खूनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मराठा समाज दुपारी रस्त्यावर उतला. मोठा जमाव पोलीस ठाण्यावर चालून आला.

बॅरिकेट्स लावून काही अंतरावर त्यांना अडविल्यानंतर माजी नगरसेवक विजय मराठे यांच्यासह पाचजणांच्या शिष्ठमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक बच्छाव यांना निवेदन दिले.

सखोल कारवाई करण्याचे आश्वासन देवून कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी ग्वाही शिष्ठमंडळास देण्यात आली.

ठाण्यात आणला मृतदेह

सीआयडीच्या अख्त्यारीत हे प्रकरण गेल्यावर इन कॅमेरा शवविच्छदन करणे क्रमप्राप्त ठरले. त्यामुळे वरिष्ठ दंडाधिकार्‍यांच्या उपस्थितीत आज दुपारी धुळ्यात शवविच्छेदन करण्यात आले.

रात्री 8.15 वाजेच्या सुमारास अ‍ॅम्बुलन्समध्ये हा मृतदेह दोंडाईचा पोलीस ठाण्यात आणण्यात आला. यावेळी मोठा जमाव पोलीस ठाण्याभोवती असल्याचे बघुन पोलीस प्रशासनाने सावधतेची भूमिका घेतली.

जमावाशी पोलीस अधीकार्‍यांनी वार्तालाप केला. जमावाच्या भावना शांतपणे समजून घेतल्या. मागणीनुसार तटस्थपणे कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिले. याचवेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक पंजाबराव देशमुख घटनेच्या प्रसंगी ठाणे अंमलदार म्हणून कार्यरत असलेले प्रमोद चौधरी, बीट हवालदार वासुदेव जगदाळे या तिघांना निलंबित केल्याचे जमावासमोर सांगितले. त्यामुळे समजोता होवून रात्री 9.30 वाजेनंतर मृत मोहन मराठे यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या