Friday, April 26, 2024
Homeधुळेपोलिसांच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह ?

पोलिसांच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह ?

दोंडाईचा – Dondaicha :

पोलिसांनी अज्ञात गुन्ह्यात मोहन सदाशिव मराठे याला सकाळी त्याच्या कामावरून अटक करून पोलीस स्थानकात आणले.

- Advertisement -

या माहितीवरून आप्तेष्टांनी जेव्हा जाब विचारला तेव्हा मेडिकलसाठी घेऊन आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, त्याच दिवशी सायंकाळी त्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

शहरातील संत कबीरनगर येथे राहणारा मोहन सदाशिव मराठे (वय 37) याला दोंडाईचा पोलिसांनी एका गुन्ह्यात संशयित म्हणून आज सकाळी कामावर असताना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले.

सदरची घटना मोहनच्या आईला कळाताच त्यांनी गावातील सामाजिक कार्यकर्ते विजू मराठे यांच्याकडे धाव घेत सदर घटना कथन केली. यावेळी विजू मराठे आणि मित्र परिवाराने याबाबत दोंडाईचा पोलिसांना विचारणा केली असता सदर व्यक्तीला मेडिकलसाठी घेऊन गेले आहे, असे सांगण्यात आले.

मात्र, काही कालावधीनंतर 8 ते 9 वाजेदरम्यान मोहन सदाशिव मराठे यांचा मृतदेह शहादा रस्त्यावर पीर बल्लीजवळ आढळून आल्याने नातेवाईक आणि मित्रपरिवाराने एकच टाहो फोडला. त्यावेळी तेथे तणाव निर्माण झाला होता.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, एपीआय संतोष लोले कर्मचार्‍यांसह दाखल झाले. मोहनच्या नातेवाईकांनी व मित्र मंडळींनी त्याचा मृतदेह उचलण्यास विरोध करत न्याय मिळण्याची मागणी केली आहे. याबाबत योग्य ती चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

संदिग्धता कायम

पोलिसांनी मोहन यास पकडून नेल्यानंतर त्याचा मृतदेह सापडला असल्याने याबाबत पोलिसांच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आणि जर मोहनचे मेडिकल करून जर त्याला पोलिसांनी सोडले असेल तर अचानक त्याचा मृत्यू झालाच कसा? असे एक नाही बरेच प्रश्नांची लाखोली नातेवाईकांकडून वाहिली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या