दोंडाईचा नगरपालिकेतर्फे मोठ्या गटारी व नालेसफाईच्या कामास सुरुवात

jalgaon-digital
1 Min Read

दोंडाईचा – Dondaicha – प्रतिनिधी :

दोंडाईचा नगरपालिका हद्दीतील मोठ्या गटारी व नालेसफाई सफाई तसेच काटेरी झुडुपे काढण्याच्या कामांस नगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सुरूवात करण्यात आली आहे.

स्वच्छता व आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली होती. अमरावती व भोगावती नदी पात्र स्वच्छ करण्यासाठी नगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे आठवड्याभरात नदीपात्र स्वच्छतेचे काम देखील मार्गी लागणार आहे.

तत्पूर्वी शहरातील मोठ्या गटारी व नाले सफाईच्या कामांची सुरुवात प्रभाग क्र.12 मधील राऊळ नगर परिसरातील भोगावती नदीच्या पुलापासून अमरावती नदीच्या मोठ्या पुलापर्यतची धुळे व नंदुरबार बायपास रस्त्यालगत असलेली मोठ्या गटारीची स्वच्छता जेसीबीच्या सहाय्याने करण्यात येऊन तेथील घाण व कचरा काढून ट्रॅक्टरच्या माध्यमातून उचलण्यात येत आहे आणि त्याठिकाणी असलेली काटेरी झुडुपे देखील लगेच काढण्यात आली असे कृष्णा नगराळे यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक भरतरी ठाकूर, माजी पाणी पुरवठा सभापती संजय तावडे, माजी आरोग्य सभापती जितेंद्र गिरासे, दोंडाईचा नगरपालिकेचे मुख्यधिकारी डॉ प्रवीण निकम, आरोग्य निरीक्षक शरद महाजन, संतोष माणिक व जनसेवा फाउंडेशन सफाई ठेक्याचे सुपरवायझर कुमार प्रभू आदी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *