Thursday, April 25, 2024
Homeधुळेकापूस वेचणार्‍या महिलेचा वीज कोसळून मृत्यू

कापूस वेचणार्‍या महिलेचा वीज कोसळून मृत्यू

दोंडाईचा – Dondaicha – वि.प्र./श.प्र :

शिंदखेडा तालूक्यातील लोहगाव येथे शेतात कापूस वेचणार्‍या महिलेच्या अंगावर आज दुपारी विज कोसळली.

- Advertisement -

त्यात महिलेचा मृत्यू झाला. पाऊस सुरु झाल्यामुळे बचाव करण्यासाठी मृत महिला निंबाच्या झाडाचा आसरा घेतला. तेव्हा ही घटना घडली.

मुक्ताबाई रवींद्र माळी (वय 32) हे मयताचे नाव आहे.शेतात मुक्ताबाईही कापूस वेचत असतांना पाऊस सुरू झाला.

यामुळे मुक्ताबाईने जवळच असलेल्या निंबाच्या झाडाचा आसरा घेतला मात्र याचवेळी झाडावर वीज कोसळल्याने मुक्ताबाईचा जागेवरच मृत्यू झाला.

मुक्ताबाईंच्या पश्चात दोन मुले आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने तहसीलदार सुनील सैंदाणे, मंडळाधिकारी एस. आर. पातुरकर, तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा लोहगाव वसमानेचे तलाठी एस.बी. गोसावी यांनी घटनास्थळी भेट दिली. व माळी कुटुंबीयांचे सांत्वन केले.

तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी माळी कुटुंबीयांना शासनाकडून त्वरित चार लाखाची आर्थिक मदत दिली जाईल असे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या