Thursday, April 25, 2024
Homeधुळेदोंडाईच्यात एक आठवड्याचा जनता कर्फ्यू

दोंडाईच्यात एक आठवड्याचा जनता कर्फ्यू

दोंडाईचा – Dondaicha – श.प्र :

शहरात सोमवारी तब्बल 116 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.त्यात मृत्यू दर ही वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता

- Advertisement -

आज झालेल्या आढावा बैठकीत नगरपरिषद, तहसील व पोलिस प्रशासनाने संयुक्तरित्या गुरुवार दि. 27 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहरात आतापर्यंत एकुण 533 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. त्यात 274 उपचार घेत असून 174 कोरोनामुक्त झाले असून सात रूग्ण मृत झाले आहे. त्यात सोमवारी तब्बल 116 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले.

एका दिवसात आढळून येणारी ही सर्वात मोठी रूग्ण संख्या आहे. वाढत्या रूग्ण संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी व कोरोनाची साखळी तुटावी यासाठी नियोजन करण्याबाबत आज अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात केवळ वैद्यकीय अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. तसेच गणपती विसर्जन मिरवणूकांना बंदी घालण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.

यावेळी मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी सांगितले की, पालिका प्रशासनाकडून सहकार्य केले जाईल. तसेच प्रत्येक नगरसेवकांनी देखील त्यांच्या परिसरातील जबाबदारी घ्यावी तसेच आपल्या भागातील कार्यकर्ते यांचा दहा स्वयंसेवक पथक तयार करून आपल्या वार्डात होणार्‍या गर्दीवर लक्ष द्यावे.

बैठकीला सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष लोले, शिंदखेडा कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. हितेंद्र देशमुख, भाजपा शहर अध्यक्ष प्रविण महाजन, आरोग्य सभापती प्रतिनिधी जितेंद्र गिरासे, मनसेचे नगरसेवक हितेंद्र महाले, अभियंता शिवनंदन राजपूत, आरोग्य निरिक्षक शरद महाजन, नगरसेवक कृष्णा नगराळे, किशन दोधेजा, नरेन भाऊसाहेब, भरतरी ठाकूर, हस्ती बँकेचे चेरमन कैलास जैन, सागर मराठे, डॉ. प्रफुल्ल दुग्गड, यासह व्यापारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या