Thursday, April 25, 2024
Homeधुळेबंद दाराआड चौकशी; आत्मदहनाचा इशारा

बंद दाराआड चौकशी; आत्मदहनाचा इशारा

दोंडाईचा – Dondaicha – वि.प्र :

येथील जिल्हा रुग्णालयात मयत झालेल्या भावाचा चौकशी अहवाल मिळावा अन्यथा कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव व ज्येष्ठ पत्रकार जे.पी. गिरासे यांनी दिला आहे.

- Advertisement -

जे.पी. गिरासे यांचे बंधू रजेसिंग प्रकाशसिंग गिरासे यांना 10 ऑगस्ट 2020 रोजी उपजिल्हा रुग्णालयात सदृश्य लक्षणे असल्याने दाखल करण्यात आले होते.

सुरुवातीला ऑक्सिजन दिल्यावर भावाची तब्येत व्यवस्थित होती मात्र ऑक्सिजन संपल्यावर भावाला पुन्हा त्रास जाणवू लागला, तब्बल 20 ते 25 मिनिटे ऑक्सिजन न मिळल्याने भावाचा मृत्यु माझ्या डोळ्या देखत झाला. याशिवाय इतर जवळची रुग्ण देखील घाबरून आरडाओरड करत होती. म्हणून जे.पी गिरासे यांनी त्याच दिवशी दोंडाईचा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

मात्र त्यांना कुठल्याही चौकशीला बोलविण्यात आले नाही. मात्र चौकशी होऊन तसा अहवाल दिला गेला असल्याचे त्यांना कळले.

मला चौकशी दरम्यान बोलवण्यात आले नाही म्हणून मला न्याय मिळण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे.

मला त्वरित न्याय न मिळाल्यास मी कुटुंबासह केव्हाही आत्मदहन करेल असा इशारा जे.पी गिरासे यांनी दिला आहे.

याबाबत त्यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, अप्पर तहसीलदार, सहायक पोलिस निरीक्षक दोंडाईचा यांना लेखी तक्रार अर्ज दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या