Thursday, April 25, 2024
Homeधुळेदोंडाईचा कृऊबाचे संचालकांची फसवणूक

दोंडाईचा कृऊबाचे संचालकांची फसवणूक

दोंडाईचा -Dondaicha – वि.प्र :

दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शरद पाटील यांची फसवणूक केल्या प्रकरणी धुळे येथील संघवी एजन्सीचे मालक नितीन संघवी यांच्याविरोधात शिंदखेडा पोलिसात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शरद पंडितराव पाटील (रा. सार्वे) यांचे वायपुर (ता. शिंदखेडा) शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गाजवळ अंबिका स्टोन क्रशर आहे.

येथे सौर पॅनल बसविण्यासाठी त्यांनी वेळोवेळी नितिन सुमतीलाल संघवी यांना आरटीजीएस, एनईएफटी द्वारे 2 नोव्हेंबर 2019 ते अद्याप पावेतो 29 लाख रूपये अदा केले.

मात्र संघवी यांनी हलक्या आणि निकृष्ट दर्जाची सौर उपकरणे बसवले. 75 किलो व्हॅट इन्व्हर्टर ऐवजी 60 किलो वॅटचे इन्वर्टर, 75 किलोवॅटचे सौर पॅनल ऐवजी 72 किलोवॅटचे सौर पॅनल बसविले. तसेच सरकारी नियमाप्रमाणे सोलर ट्रक्चर उभारणी केली नाही.

याशिवाय 30 वर्षाची वारंटी कार्ड न देता जीएसटी ई वे बील न देता शासनाची देखील फसवणूक केली. उलट शरद पाटील पैसे देत नाही अशी बदनामी केली आणि निकृष्ट व हलक्या दर्जाची उपकरणे बसवल्याने आपली फसवणूक केल्याची फिर्याद शरद पाटील यांनी शिंदखेडा पोलिसात दिली आहे.

त्यानुसार संघवी एजन्सीचे मालक नितीन संघवी यांच्याविरूध्द शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुशांत वळवी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या