Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयनारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

दोंडाईचा – Dondaicha – श.प्र :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नारायण राणे यांनी एकेरी उल्लेख केल्यामुळे शहर शिवसेनेतर्फे राणे यांच्या

- Advertisement -

प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात एकेरी भाषेत वक्तव्य केले. याच्या निषेधार्थ काल दुपारी आझाद चौकात शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून,

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे व पोलिस अधिनियमाचे कलम 37, 1 व 3 चे उल्लंघन केेले. याप्रकरणी पोकाँ प्रकाश जाधव यांच्या फिर्यादीवरून चेतन राजपूत, शैलेश सोनार, दिपक मराठे, आबा चित्ते, राकेश पेटकर, विजय भोई, चुडामण बोरसे, देवेंद्र अहिरे, निखिल जयसिंघाणी, निलेश चौधरी, भूषण चौधरी, ज्ञानेश्वर पारधी यांच्याविरुद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉा सुनील महाजन करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या