गोडावूनमधून तांदळाचे 98 पोते लंपास

jalgaon-digital
1 Min Read

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

दोंडाईच्यात चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली आहे. शहरातील जुन्या शहादा रोडवरील कैलास ट्रेडर्सचे गोडावून फोडून चोरट्यांनी सव्वा लाखांचे तांदळो 98 पोते लंपास केल्या आहेत. याप्रकरणी तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोंडाईचातील सिंधी कॉलनीतील रहिवासी गिरधारी नानकराम रूपचंदाणी (वय 60) यांचे जुना शहादा रस्त्यावर कैलास ट्रेडर्स नावाचे गोडावून आहे.

काल दि.4 रोजी पहाटे दोन ते पाच वाजेदरम्यान तीन चोरट्यांनी गोडावूनचे शटर तोडून उचकटून आत प्रवेश केला.

1 लाख 8 हजार रूपये किंमतीचे चॉकलेट लष्करी फोलमना चाचे 30 किलोच्या तांदळाचे 72 पोते व 27 हजार 300 रूपये किंमतीचे चॉकलेट चुणेर तांदळाचे 26 पोते असा एकुण 1 लाख 35 हजार 300 रूपयांचा मुद्येमाल लंपास केला आहे.

याप्रकरणी गिरधारी रूपचंदानी यांच्या फिर्यादीवरून शिवाजी संपत वळवी (रा. संत कबीदास नगर, दोंडाईचा), लालु तिरथराम शर्मा (रा. सिंधी कॉलनी, दोंडाईचा) व उत्तम मारोती थोरात (रा. दोंडाईचा) या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकाँ वासुदेव जगदाळे हे करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *