Thursday, April 25, 2024
Homeधुळेदोंडाईचात बिअरशॉपी, हॉटेलवर धाड

दोंडाईचात बिअरशॉपी, हॉटेलवर धाड

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

दोंडाईचात थर्टीफस्टच्या पार्श्वभुमिवर पोलिस व दारूबंदी विभागाचे संयुक्तपणे आज कारवाईची मोहिम राबविली.

- Advertisement -

त्यात बिअरशॉपीमध्ये देशी दारूसाठा मिळून आला. तर एका हॉटेलमधून 47 हजारांची दारू जप्त करण्यात आली आहे.

दोंडाईचा शहरातील शासन मान्यताप्राप्त असलेल्या भाऊ तानाजी बियर शॉपी, हॉटेल अभिजित परमिटबार द वाईन शॉपी, मानराज बियर बार व वाईन शॉपी, एल.एम.चौधरी बियर शॉपी, रत्नम बियर शॉपी यांच्यावर पोलीस व दारुबंदी प्रशासन विभागातर्फे थर्टीफर्स्टच्या अनुषंगाने संयुक्तरित्या तपासणी मोहिम राबविण्यात आली.

या शॉपीमध्ये नियमप्रमाणे ठरवून दिलेले स्टॉक रजिस्टर, सेल रजिस्टर यांच्या दैनंदिन नोंदी घेतले नसल्याचे आढळून आले. तसेच सदर बियर शॉपीमध्ये देशी व विदेशी दारु विकण्याचा परवाना नसतांना देखील देशी दारुचा साठा आढळून आला.

तसच सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, डी.व्ही.आर. व टी.व्ही.स्क्रीन लावणे बंधनकारक असतांना देखील सदरचे इलेक्ट्रॉनिक स्वरुपाचे साहित्य हे बंद व काहीठिकाणी नसलेले आढळून आले. परमिट रुम वगळता बियर शॉपीमध्ये देखील मद्यपींना बसण्याकरीता आसन व्यवस्था केल्याचे दिसून आले. ते शासन मान्य नाही.

हॉटेल अभिजीत परमिटबार व वाईन शॉपी येथे तपासणी केली करता जितेंद्र नानाभाऊ मराठे यांच्याकडे लायसन्स व मान्यताप्राप्त अलेलेली कागदपत्र मागितली असता त्यांनी देण्यांस टाळाटाळ केली.

त्यानंतर सदर हॉटेलमध्ये ए.सी.रुम नाव असलेले बंदरुम उघडून पाहीले असता त्यात परवानगी नसतांना मद्याचा साठा आढळून आला. त्यात 47 हजारांची देशी दारू जप्त करण्यात आली.

ही कारवाई परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, दारुबंदी विभागाचे अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील कारवाई पोलीस उपनिरीक्षक एम.पी. पवार व कर्मचारी हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या