Wednesday, April 24, 2024
Homeधुळेदोंडाईचातील अग्रसेन पतपेढी इमारतीचा लिलाव !

दोंडाईचातील अग्रसेन पतपेढी इमारतीचा लिलाव !

दोंडाईचा – Dondaicha – वि.प्र :

जिल्हा ग्राहक मंचच्या आदेशान्वये आणि जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशाप्रमाणे शहरातील अग्रसेन पतसंस्थेच्या इमारतीचा

- Advertisement -

एक कोटी 41 लाख रूपयात जाहीर लिलाव दोंडाईचा अप्पर तहसील अंतर्गत झाला. अनेक वर्षापासून विक्रीसाठी प्रलंबित असलेला या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

सुमारे 20 ते 22 वर्षापुर्वी धुळ्यात मेन शाखा असलेल्या श्री अग्रसेन पतसंस्थेने दोडाईच्यात देखील शाखा सुरू केली.

पतसंस्थेने जनतेला जादा व्याजाचे आमीष दाखविले. नागरिक देखील त्यांच्या आमिषाला बळी पडले. पतसंस्थेने गोरगरीब, मध्यम वर्गीय, श्रीमंतांच्या करोडोच्या ठेवी स्विकारल्या. धनदांडग्यांना कर्ज दिले.

बड्या व्यक्तीकडून कर्जवसुली न झाल्याने पतसंस्थेचे दिवाळे निघाले. त्यानंतर अनेक ठेविदारांचे उज्वल भविष्य अंधकारमय झाले.काहींचे संसार उघड्यावर पडले. तर काहींचे लग्न मोडकळीस आले.गोरगरिबांनी पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला.

दरम्यान श्री अग्रसेन पतपेढीचा आज चौथ्यांदा लिलाव झाला आहे.एकदा अपसेट प्राईज 82 लाख, 87 लाख, 96 लाख तर 2003 मध्ये 1 लाख 17 हजार होती. तरी कोणीही बोली लावली नाही. अर्थात लिलाव झाला नव्हता.

मात्र यावेळी विशेषतः लॉकडाऊन कालावधी आणि अर्थव्यवस्था मजबूत नसताना शासनाची अपसेट प्राईज 75 लाख 60 हजार असताना जाहीर लिलावात सर्वाधिक बोली बलराम हरेश कुकरेजा यांनी लावत अग्रसेन पतसंस्थेची इमारत विकत घेतली.

गुंतवणूक करणार्‍यांना पैसे मिळण्याची अपेक्षा

आज वीस वर्षे झाल्यानंतर देखील ठेवीदार ग्राहक आपले कष्टाचे पैसे आपणास परत मिळतील अशी आस धरून आहेत. लिलावाच्या प्रत्येकाला आपला हक्काचा पैसा मिळेल का? मिळेल तर कधी मिळेल? कोणाकोणाला मिळेल? किती मिळेल? त्याचे निकष कसे असतील? असे एक ना अनेक प्रश्न ठेवीदार ग्राहकांकडून उपस्थित होत आहेत.

शासनाने याची दखल घेऊन व्यवहार पार पडला तर त्यातून आधी रकमा परत देताना दोंडाईचा येथील ग्राहकांना प्राधान्य दिले जावे ,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अग्रसेन पतसंस्थेचा एक कोटी 41 लाखात लिलाव

29 ऑक्टोबर रोजी सकाळी काही लोकांनी अपर तहसील कार्यालयात तर काहींनी थेट लिलावाच्या ठिकाणी धाव घेतली.

शहरातील उद्योजक ज्ञानेश्वर भामरे, माजी नगराध्यक्ष नानाभाऊ मराठे, नगरसेवक गिरधारीलाल रूपचंदानी, रामभाऊ ठाकूर, महेश कुकरेजा, भटू पाटील, बलराम कुकरेजा, रविराज भामरे, शिवराज भामरे, दिनेश व्होरा, डॉ. सचिन सोहनलाल पारख, सुंदरलाल चैनानी, रमेश कोळी आदी 12 जणांनी लिलावात सहभाग घेतला.

यावेळी बलराज हरीश कुकरेजा यांनी एक कोटी 41 लाखाची सर्वाधिक बोली लावत इमारत घेतली. या पोटी त्यांनी 25 टक्के रक्कम प्रमाणे 35 लाख रुपये अदा देखील केले.

यावेळी शासन स्तरावरील अप्पर तहसीलदार सुदाम महाजन, दोंडाईचा पोलीस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, मंडळाधिकारी महेशकुमार शास्त्री आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या