Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रआषाढी एकादशी निमित्त विठूरायाच्या चरणी भरभरून दान

आषाढी एकादशी निमित्त विठूरायाच्या चरणी भरभरून दान

सोलापुर | Solapur

पंढरपुरचा विठुमाऊली (Pandharpur Vitthal Rukmini) म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवतच. आषाढी एकादशीनिमीत्त (Ashadhi Ekadashi) संपुर्ण महाराष्ट्रातून विठ्ठल भक्त पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. भक्त आपली मनोकामना घेऊन विठुरायाकडे येत असतात, काहींच्या मनोकामना पुर्ण झाल्यावर भक्त मंदिराला भरभरुन दान देत असतात. हे दान वेगवेगळ्या प्रकारे स्वरुपात असते. या दानाच्या या दानाच्या (Donation to Vitthal Rukmini Devasthan) रक्कमेतून कोट्यवधी रुपये दरवर्षी जमा होतात. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त दान जमा झाले.

- Advertisement -

यावर्षी आषाढी यात्रेत तब्बल सहा कोटी २८ लाख रुपयाचे उत्पन्न मंदिर समितीला मिळाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा ५७ लाख ६३ हजार इतके उत्पन्न अधिक मिळाल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे. मंदिर समितीला यावर्षी मोठ्याप्रमाणावर दान मिळाले आहे. ऑनलाईन नित्य पुजेच्या स्वरुपात ४२ हजार, देणगी दोन कोटी तेरा लाख मिळाले, त्याचबरोबर भाविक मोठ्या संख्येने आल्याने मंदिर समितीच्या वेदांता, व्हिडीओकॉन भक्त निवास येथून एकूण २२ लाख २४ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच महानैवेद्यकीय योजना ९८ हजार, मनी ऑर्डर १ लाख ४० हजार, तुळशी पुजा ४२ हजार.

Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप; भाजप तीन ते चार मंत्र्यांचे राजीनामे घेणार?

सोन्या चांदीच्या वस्तु रुपात विठुरायाच्या चरणी तीस लाखांचे दान म्हणून प्राप्त झाले आहे. तर बुंदीच्या लाडू प्रसाद विक्रीतून ७५ लाख रुपये समितीला मिळाले आहे. यासोबतच रुक्मिणीच्या चरणी १२ लाख ६८ हजार रुपये दान मिळाले आहे.

दरम्यान, एसटी महामंडळाला सुध्दा यंदा विठुराया पावला असून आषाढी एकादशीसाठी वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस.टी.महामंडळातर्फे २५ जून ते ०५ जुलै दरम्यान सुमारे ५ हजार विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. या ५ हजार बसेसव्दारे १७ हजार ५६६ फेऱ्यांमधून ०८ लाख ८१ हजार ६६५ प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला असून, यातून २७ कोटी ८८ लाखांचे रुपये उत्पन्न एसटीला मिळाले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या