Friday, April 26, 2024
Homeनाशिकचोरट्यांकडून दानपेटी लंपास

चोरट्यांकडून दानपेटी लंपास

येवला | प्रतिनिधी | Yeola

शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास येवला तालुक्यातील (yeola taluka) पिंपळखुटे तिसर्‍यातील प्रसिद्ध मसोबा मंदिरात चोरट्यांनी (Thieves) दानपेटी (Donation box) चोरून दूरवर नेऊन फोडली.

- Advertisement -

या दानपेटीतील अंदाजे रक्कम 1 लाख 5 हजार इतकी रक्कम चोरट्यांंनी लंपास केली आहे. सोबत चोरट्यांनी मंदिराचा सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा (CCTV Camera) डीव्हीआर (DVR) देखील पळून नेला आहे

घटनेची अधिक माहिती अशीकी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांंनी पिंपळखुटे येथील विद्युत पुरवठा खंडित (Power outage) करून म्हसोबा मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारला. सोबतच मंदिरात ठेवलेला सीसीटीव्हीचा (CCTV) डिव्हीआर (DVR) देखील पळून नेला. गेल्या वर्षी देखील मंदिरातील दानपेटी फोडण्याची घटना घडली होती या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आला होता मात्र चोरट्यांनी यावेळेस चोरीची नवी पद्धत अवलंबली आहे.

घटनेची माहिती पोलिसांना समजतात घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी (Upper Superintendent of Police Chandrakant Khandvi), मनमाड पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सहाय्यक निरीक्षक एकनाथ भिसे, पोलीस हवालदार माधव सानप, पोलीस शिपाई आबा पिसाळ सतीश मोरे, आधी सह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक विश्वनाथ काकड यांनी पाहणी केली. येवला तालुका पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली असून याकडे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे करत आहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या