Wednesday, April 24, 2024
Homeनगरदानपेटी फोडणार्‍या दोघांना अटक

दानपेटी फोडणार्‍या दोघांना अटक

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील मंदिर दानपेट्या फोडीच्या घटनेचा अकोले पोलिसांनी छडा लावत दोन आरोपीना अटक करण्यात यश मिळविले आहे.त्यांचे कडून दोन मोटारसायकलसह 80 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.त्यांच्या कडून यापूर्वी तालुक्यात झालेल्या चोर्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

अकोले तालुक्यात गेल्या काही महिन्यापासुन मोठ्या प्रमाणात मंदिराच्या दानपेट्या फोडून चोरीच्या घटना घडत होत्या. याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष होता. याबाबत पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी मंदिर चोरीबाबत सखोल तपास करण्याचे आदेश अकोले पोलिसांना दिले होते. यानंतर अकोलेचे प्रभारी पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी पथक तयार केले होते. हे गस्ती पथक दिनांक 13 सप्टेंबर 2021 रोजी रात्री प्रवरा नदीच्या पलीकडे, रस्त्याचे कडेला, महालक्ष्मी मंदिर परिसरात गस्त घालत होते. रात्री 11 वाजेच्या सुमारास तीन इसम हे संशयीत रित्या महालक्ष्मी मंदिराचे गेटजवळ दिसल्याची गुप्त माहितीवरून परखतपूर रस्त्यावर या पथकाने नागरिकांचे मदतीने दोघांना पकडले तर यातील एक जण फरार झाला आहे. मच्छिंद्र पांडुरंग मेंगाळ, राजु ठमा मेंगाळ (दोघे रा. उंचखडक खुर्द, ता. अकोले) यांना रंगेहात पकडले तर यावेळी साथीदार विलास लक्ष्मण गावंडे (रा. उंचखडक खुर्द) हा फरार झाला आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या दोघांकडून त्यांचे कडुन चोरीत वापरलेले साहित्य, कटावणी, ग्रॅण्डर, रोख रक्कम व दोन मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. त्यांच्या विरूद्ध अकोले पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर 352/2021 भा.द.वि. कलम 379,511 प्रमाणे गुन्हा दाखल केला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.

आरोपींकडे अधिक चौकशी केली असता महालक्ष्मी माता मंदिर अकोले, दत्त मंदिर रुंभोडी ता अकोले, अंबिका माता मंदिर गणोरे ता. अकोले व आंबाबाई मंदिर टाहाकारी, ता. अकोले या मंदिरामध्ये चोरी केल्याची आरोपीनी कबुली दिली असुन त्यांचे घरझडती मध्ये त्यांचे कब्जातून 2 मोटार सायकल, 1 एमप्ली फायर, दोन सांऊड, 1 दानपेटी, ग्रॅण्डर मशिन, लोखंडी कटावण्या व रोख रक्कम व इतर साहित्य असा एकुण 80,000 रुपंयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन फरार आरोपीचा शोध सुरु असल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे.

ही कारवाई पोलिस अधिक्षक मनोज पाटील व मा. अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि तथा प्रभारी पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, पोसई भुषण हांडोरे, पोना अजित घुले, पोना विठ्ठल शेरमाळे, पोना बाळासाहेब गोराणे, चालक पोना गोविंद मोरे, पोना रविंद्र वलवे, पोकॉ आनंद मैड, पोकॉ गणेश शिंदे, पोकॉ प्रदिप बढे, पोकॉ आत्माराम पवार, पोकॉ संदिप भोसले, पोकॉ नागरे यांनी केली आहे.

नागरिकांना आवाहन..

आपले गावात किंवा परिसरात कोठेही संशयीत रित्या व्यक्ती दिसुन आल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात कळवा तसेच चोरी करणार्‍या टोळी बाबत काहीएक माहिती असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन अकोले प्रभारी पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या