Friday, April 26, 2024
Homeनाशिकसुनेची तक्रार; माजी मंत्र्यांवर कौटुंबिक छळाचा गुन्हा

सुनेची तक्रार; माजी मंत्र्यांवर कौटुंबिक छळाचा गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सुनेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने माजीमंत्री मधुकर पिचड (Madhukar Pichad) व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने मधुकर पिचड यांच्या पत्नी कमलबाई, मुलगी अश्विनी पिचड या संशयितांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

- Advertisement -

पिचड यांच्या सुनेने केलेल्या तक्रारीनुसार, घरातून हाकलून दिल्याचे व पोलिसांकडे तक्रार केल्यास दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पिचड कुटुंबीयांनी आपले पती किरण यांना देखील आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हटले आहे.

सासरे, सासू व नणंद यांनी संगनमताने आपल्या नावावर असलेल्या कंपनीच्या मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करून कंपनी स्वत:च्या नावावर करून घेतली. पिचड कुटुंबीयांची राजकीय पार्श्वभूमी व वर्चस्व आहे. तसेच ते आर्थिकदृष्ट्या धनाढ्य असल्यामुळे सुनेने थेट पोलीस ठाण्यात तक्रार न करता न्यायालयाकडे (Court) फिर्याद दाखल केली होती.

ॲड. उमेश वालझाडे (Umesh Walzade) यांनी तक्रारदाराच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद केला असता, मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधितांना दिले.

पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित मधुकर पिचड, त्यांची पत्नी व कन्येविरुद्ध सुनेचा कौटुंबिक छळ व तिच्या पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या