Thursday, April 25, 2024
Homeनगरघरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस काढून बेकायदेशीर विक्री

घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस काढून बेकायदेशीर विक्री

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहर पोलिसांनी शहरात दोन ठिकाणी छापा टाकुन घरगुती वापराचे गॅस सिलेडर इलेक्ट्रीक मोटारच्या साह्याने अ‍ॅटो रिक्षाच्या सिलेंडरमध्ये बेकायदेशीर रित्या भरुन विक्री करणार्‍या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 29 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. बाळासाहेब अनंतराव गाडेकर व संतोष जालींदर चव्हाण (दोघे रा. श्रीरामपूर) अशी त्यांची नावे आहेत.

- Advertisement -

शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना पेट्रोलिंग करीत असताना त्यांना, बाळासाहेब अनंतराव गाडेकर (वय 62, रा. गोंधवणी रोड झोपडपट्टी, पाण्याच्या टाकी जवळ, वार्ड नं.1, श्रीरामपूर) हा त्याच्या राहते घरी तसेच संतोष जालींदर चव्हाण (वय 31, रा. वॉर्ड नं. 7, लबडे वस्ती, श्रीरामपूर) हे दोघेही शिरसाठ हॉस्पिटल जवळ, नॉर्दन ब्रँच येथे घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधील गॅस इलेक्ट्रीक मोटरच्या सहाय्याने अ‍ॅटो रिक्षामधील गॅस टाकीत भरून बेकायदेशीर विक्री करीत आहेत. अशी माहिती मिळाली. त्यांनी याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना माहिती दिली असता, त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश गवळी यांना दिले. त्यानंतर त्यांनी दोन पंचाना बरोबर घेवुन छापा टाकला.

यावेळी बाळासाहेब अनंतराव गाडेकर याच्या ताब्यात 7 हजार रुपये किमतीची पांढर्‍या रंगाच्या लाकडी स्टुलवर फिक्स केलेली एक इंच क्षमतेची एक इलेक्ट्रिक मोटर, अर्धा इंच क्षमतेची दोन निळ्या रंगाचे प्लास्टिक पाईप त्याचे तोंडाला लोखंडी वॉल्व तसेच 4 हजार रु. कि.ची एक सिल्व्हर रंगाची इलेक्ट्रिक मोटर, अर्धा इंच क्षमतेची व तिला निळ्या रंगाची अर्धा इंच क्षमतेचे दोन प्लास्टिक पाईप त्यांचे तोंडाला लोखंडी वॉल्व, 2 हजार रुपये किमतीचा एक सोनाटा कंपनीचा इलेक्ट्रिक वजनकाटा व 5 हजार 500 रुपये किमतीचा एचपी कंपनीच्या 5 गॅस सिलेंडर भरलेल्या टाक्या असा 18 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.

तसेच संतोष जालींदर चव्हाण याचे ताब्यात 7 हजार रु. कि.ची एक इलेक्ट्रीक मोटर अंदाजे एक इंच क्षमतेची तिला काळ्या रंगाचे दोन प्लास्टीक पाईप पैकी एकाचे तोंडाला लोखंडी वॉल्व व एकाचे तोंडाला पितळी वॉल्व असलेले, मोटरीला अंदाजे 5 फुट लांबीची एक काळ्या रंगाची पट्टी केबल, त्याचे तोंडाला दोन धातुचे चिमटे, 4 हजार रु.कि.च्या 6 गॅस टाक्या असा 11 हजार रुपये मिंमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी दोघांकडील मिळून एकुण 29 हजार 500रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीवर अनुक्रमे गु.र.नं. 358/2023, गु.र.नं. 359/2023 अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 चे कलम 3, 7 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी करीत आहेत.

पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सहायक पोलीस निरीक्षक़ जे. बी. बोरसे, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, गौतम लगड, रमिझ अत्तार, गणेश गावडे, मच्छिंद्र कातखडे, संभाजी खरात यांनी सदरची कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या