Saturday, April 27, 2024
Homeनगरकुत्रा चावल्याने बालकाचा मृत्यू

कुत्रा चावल्याने बालकाचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घराबाहेर अंगणात खेळणार्‍या अडीच वर्षांच्या बालकावर मोकाट कुत्र्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना भिंगारच्या आलमगीर परिसरात घडली. आयुष जितू काळे असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. आयुष हा गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घराबाहेर खेळत असताना एका मोकाट कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला.

- Advertisement -

या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला चावा घेतला होता. त्याच्या पालकांनी त्यास उपचारासाठी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या