Friday, April 26, 2024
Homeनगरऐतिहासिक नगरची कागदपत्रे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जतन होणार

ऐतिहासिक नगरची कागदपत्रे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जतन होणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहराला ऐतिहासिक, सामाजिक, अध्यात्मिक अशी उज्ज्वल परंपरा आहे. या शहराचा ऐतिहासिक दस्तऐवज, महत्वपूर्ण लिखित माहिती, नकाशे, तसेच जतन करून ठेवलेले मोडी भाषेतील माहिती, यासह महत्वपूर्ण अभिलेख आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अबाधित राहावे या हेतूने महापालिका प्रयत्न करणार असल्याची माहिती, सभागृह नेते रवींद्र बारस्कर यांनी दिली.

- Advertisement -

बारस्कर यांच्यासह इतिहास तज्ज्ञ भूषण देशमुख, सहायक आयुक्त दिनेश सिनारे, संगणक विभाग प्रमुख अंबादास साळी, माहिती सुविधा विभाग प्रमुख विजय बालानी, दक्षता पथक प्रमुख शशिकांत नजन यांनी महापालिकेच्या रेकॉर्ड विभागाची पाहाणी केली. येणार्या पिढीला आपल्या शहराचा इतिहास माहीत असणे गरजेचे आहे. नगरपालिकेची स्थापना 1954 मध्ये झाली. दीडशे वर्षांनंतर 2003 मध्ये महानगरपालिकेची स्थापना झाली.

सुदैवाने जुन्या काळातील अनेक दस्तऐवज महापालिकेच्या जुन्या वास्तूत आहेत. तिथल्या उंच फडताळात लाल कापडात गुंडाळून जुन्या फाईली, रजिस्टर ठेवण्यात आली आहेत. जर दुर्दैवाने विजेचे शॉर्ट सर्किट झाले तर हा अनमोल ऐतिहासिक ठेवा नष्ट होऊ शकतो. यामुळे उपलब्ध अभिलेख जतन करण्यासाठी आधुनिक तंत्राची मदत घेऊन सर्व कागदपत्रे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जतन केले जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या