Thursday, April 25, 2024
Homeनगरआ. लंकेंच्या कोविड रुग्णसेवेवर डॉक्युमेंटरी

आ. लंकेंच्या कोविड रुग्णसेवेवर डॉक्युमेंटरी

पारनेर | तालुका प्रतिनिधी

पारनेरचे (parner) आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी करोना (COVID19) काळामध्ये कोविड रुग्णांची सेवा केली. त्यांचे हे कार्य सातासमुद्रापार गेली आहे. ओएमजी फिल्मस प्रोडक्शन हाऊसने (OMG Films Production House) त्यांच्यावर नव्वद मिनिटाची डॉक्युमेंट्री (Documentary) तयार केलेली आहे. भारताचा सर्वोत्कृष्ट करोना योद्धा या नावाने तयार करण्यात आलेल्या या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरकरीता चित्रीकरण दोन दिवसापूर्वी मुंबईत (Mumbai) झाले. (Documentary on Nilesh Lanke)

- Advertisement -

करोना वैश्विक संकटाने गेल्या दोन वर्षांमध्ये संपूर्ण मानवी जातीचा जीव धोक्यात आणला. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. बेड, व्हेंटिलेटर त्याचबरोबर ऑक्सिजन यामुळे कित्येकांचा दोनही लाटेमध्ये जीव गेला. अत्यंत भयानक आणि विदारक अवस्थेतून संपूर्ण जगाने मार्गक्रमण केले. त्याला भारत आणि महाराष्ट्र त्याचबरोबर पारनेर नगर सुद्धा अपवाद ठरले नाही.

सर्वसामान्य नागरिकांचा जीव वाचला पाहिजे या हेतूने आमदार निलेश लंके यांनी सलग दोन वर्षे शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिर नावाने कोविड सेंटर सुरू केले आणि त्यामध्ये पन्नास हजारांपेक्षा जास्त रुग्णांना वैद्यकीय उपचार दिले. त्याचबरोबर या आजाराची भीती जावी या अनुषंगाने कोविड सेंटरमध्ये आल्हाददायक वातावरण तयार करण्यात आले. विविध कार्यक्रमांचे आयोजन त्याचबरोबर त्यांना उत्तम दर्जाचा आहार देण्यात आला.

एका सर्वसामान्य कुटुंबातील आमदाराने वैश्विक संकटात इतके मोठे काम केल्याने त्यांच्या कार्याची महती सातासमुद्रापार गेली. त्यांच्या या कोविड मधील कामावर ओएमजी फिल्मस प्रोडक्शन हाऊसने भारताचा सर्वोत्कृष्ट करोना योद्धा या नावाने डॉक्युमेंटरी तयार केली आहे. शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिर भाळवणी या ठिकाणी तब्बल वीस दिवस चित्रीकरण करण्यात आले. एकूण 90 मिनिटांची ही डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली आहे.

ती अत्यंत दर्जेदार असून त्याच्याकरिता आवश्यक असलेल्या पोस्टरचे चित्रीकरण दोन दिवसांपूर्वी मुंबईत करण्यात आले. त्याचबरोबर आमदार निलेश लंके यांचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला. यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे राज्य सचिव अॅड राहुल झावरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अशोक घुले, सचिन काळे आणि महेंद्र शिंदे, डॉक्युमेंट्री चे निर्माते, दिग्दर्शक सुशील कलाकार अर्चना चाटे, सहकलाकार वैभव आंबेकर व इतर उपस्थित होते. या डॉक्युमेंट्रीच्या ‌छायाकंन चित्तरंजन धळ आणि गणेश भापकर यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या