Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशइंडियन मेडिकल असोसिएशनच्या बंदला मुंबईत चांगला प्रतिसाद

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बंदला मुंबईत चांगला प्रतिसाद

नवी दिल्ली –

केंद्र सरकारने आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेसाठी दिलेली परवानगी मागे घ्यावी या मागणीसाठी इंडियन मेडिकल

- Advertisement -

असोसिएशनने आज एकदिवसीय बंद पुकारला होता. या बंदला मुंबईत चांगला प्रतिसाद मिळाला. महापालिका रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण सेवा सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद ठेवल्या होत्या. महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती लावून काम केले तर होमिओपॅथी डॉक्टरांनी गुलाबी फिती लांबून केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. महापालिकेच्या रुग्णालयात कोविड सेंटर आणि महत्वाच्या शस्त्रक्रिया सुरू राहिल्याचं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या