डॉ. काळे परिवाराकडून नेवासा कोविड सेंटरला 50 हजारांची औषधे

jalgaon-digital
1 Min Read

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

तालुक्यातील नागपूर येथील रहिवासी व नेवासा फाटा येथील श्वास हॉस्पिटलचे संचालक डॉ. अविनाश काळे व परिवाराचे वतीने नेवासा कोविड सेंटर करिता

श्रीक्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरीजी महाराज यांचे हस्ते 50 हजार रुपये किंमतीची औषधे भेट देण्यात आली.

वैद्यकीय अधिकारी डॉ अभिराज सूर्यवंशी यांनी भास्करगिरीजी महाराज यांचे हस्ते ही औषधे स्वीकारली. सुमारे दोनशे कोरोना बाधित रुग्णांना या औषधांचा लाभ होणार आहे. यावेळी डॉ.अविनाश काळे, सौ.प्रियंका काळे, निष काळे, गणेश लंघे उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *