Saturday, April 27, 2024
Homeजळगावपहूर येथे डॉक्टर तरुणीची आत्महत्या

पहूर येथे डॉक्टर तरुणीची आत्महत्या

पहूर, ता.जामनेर – Jamner :

आई -वडील लग्नासाठी बघितलेल्या मुलाला होकार कळविण्यासाठी गेले असताना घरी कोणीही नसल्याचे पाहून डॉक्टर तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथील मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील संतोषीमातानगरात शामराव नामदेव सावळे हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांची मुलगी प्रतिभा (वय 23) हीच्या विवाह संबंधी बोलणीकरण्यासाठी ते पत्नी, मुलगा शुभम व मुलगी स्नेहल यांच्यासह जवाहर (जि.पालघर) येथे गेले होते.

दरम्यान डॉ. प्रतिभा ही घरी एकटीच होती. शेजारी राहणार्‍या काकांकडे तिने दुपारी 1 वाजेच्या सुमारास जेवण करून आपल्या घरी आली.

तीचे काका रामराव सावळे हे शेतातून घरी आल्यावर डॉ.प्रतिभाचा फोटो आणण्यासाठी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांनी मुख्य दरवाजा ठोठावला. मात्र घरातून प्रतिसाद आला नाही.

त्यांनी लहान मुलीला घरात जाण्यासाठी लहान जागा आहे, तिथून पाठवले असता डॉ. प्रतिभाने गळफास गेले घेतला असल्याचे तिने सांगितले. मग दरवाजा उघडून आत मध्ये असता डॉक्टर प्रतिभा भिंती जवळील छतास असलेल्या कडीला ओढणी बांधून जीवन यात्रा संपविल्याचे आढळून आले.

यानंतर आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने पोलिसांच्या समक्ष मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेला. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर तिला मृत घोषित केले.

रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात येणार होते. याप्रकरणी रामराव नामदेव सावळे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण समजू शकले नाही

- Advertisment -

ताज्या बातम्या