Friday, April 26, 2024
Homeनगरज्ञानेश्वर कारखाना 8 मयत कामगारांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखाच्या मदतीचे वाटप

ज्ञानेश्वर कारखाना 8 मयत कामगारांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखाच्या मदतीचे वाटप

भेंडा |वार्ताहर| Bhenda

येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व ज्ञानेश्वर सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने विविध कारणाने निधन झालेल्या कामगारांचे वारसांना प्रत्येकी एक लाख प्रमाणे 8 लाख रुपयांचे आर्थिक मदतीचे वाटप कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे हस्ते करण्यात आले.

- Advertisement -

कारखान्याचे विविध विभागातील आजारपण, रस्ता अपघात, करोना अशा विविध कारणाने 8 कामगारांचे निधन झाले होते. कारखाना व्यवस्थापन व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त निधीतून निधन झालेल्या कामगारांचे वारसाला एक लाख रुपये मदत दिली जाते. त्यानुसार श्रीमती अनिता राजू पुंड, उषाताई दत्तात्रय भोसले, अनिता प्रकाश शिंदे, परविन अजीज पठाण, वैशाली मुकुंद धस, रंजना विष्णू नवले, कुसूम चांगदेव फुलारी, संगीता दत्तात्रय नवले यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आला.

यावेळी संचालक काशिनाथ नवले पाटील, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे, भगवान शेंडगे, रमेश साळुंके, अशोकराव चौधरी, रामकृष्ण नवले, सांस्कृतिक मंडळाचे सचिव कृष्णा उगले, सहसचिव दत्तात्रय काळे, खजिनदार कारभारी गरड, मानद सचिव अप्पासाहेब बोडखे, पांडुरंग विधाटे, कल्याण गायकवाड आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या