Saturday, April 27, 2024
Homeनगरडी. एल. एड. प्रवेशासाठी 27 डिसेंबरपर्यंत विशेष फेरी

डी. एल. एड. प्रवेशासाठी 27 डिसेंबरपर्यंत विशेष फेरी

संगमनेर |वार्ताहर| Sangmner

राज्यातील समितीद्वारे अध्यापक विद्यालयातील शासकीय कोट्यातील प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशाच्या तीन फेर्‍या पूर्ण झाल्यानंतर

- Advertisement -

रिक्त राहिलेल्या जागांसाठी 22 डिसेंबरपासून विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यात बारावीचा निकालानंतर डी. एल. एड. साठीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले त्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत यापूर्वी सामावून घेण्यात आले आहे. तथापि शासकीय कोट्यातील जागा रिक्त राहिल्या आहेत त्या ठिकाणच्या जागा भरण्यासाठी पुन्हा विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले असून, प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य या पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहे.

यासाठी 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर या कालावधीत संकेतस्थळावर अर्ज भरावयाचे असून, 22 ते 27 डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन पडताळणी करण्यात येणार आहे.याखेरीज यापूर्वी अर्ज सादर करू न शकलेली व सादर करताना विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना नियमित प्रवेश प्रक्रियेत अध्यापक विद्यालय मिळाले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम बदलून द्यावेत.

यापूर्वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी ज्या विद्यार्थ्यांचे शुल्क भरले आहे त्यांनी विशेष प्रवेश फेरी साठी नव्याने शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. मात्र त्यांनी त्यासाठी यापूर्वीचा मोबाईल नंबर व ई-मेल आयडी वापरणे आवश्यक असणार आहे. पडताळणीसाठीची प्रवेश प्रक्रिया व प्रवेश नियमावली बाबत डायट स्तरावरून कार्यवाही करण्यात येणार आहे.

विशेष फेरीत एखाद्या विद्यार्थ्याने प्रवेश घेतला व त्यानंतर तो रद्द झाल्यास त्या जागी दुसर्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही. विद्यार्थ्यांचे उमेदवारी अर्ज पडताळणी अधिकार्‍याने मान्यता दिल्याशिवाय त्या विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित करण्यात येणार नाही. व्यवस्थापन कोट्याची प्रवेश प्रक्रिया शासकीय कोट्यातून प्रवेश प्रक्रिया समांतर असल्याने व्यवस्थापन कोट्यातील विशेष फेरीप्रमाणे प्रवेश प्रक्रिया असल्याने याबाबतची कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करावयाची आहे. मुदतीनंतर केलेल्या कार्यवाहीचा विचार करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थ्याने ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर त्याला अध्यापक विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन प्रवेश पत्राची प्रत मिळणार आहे.प्रवेशपत्रानंतर चार दिवसांच्या आत अध्यापक विद्यालयात जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घ्यावे लागणार आहेत, तर अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रमाणपत्राची पडताळणी करूनच ऑनलाईन पद्धतीने अध्यापक विद्यालयाच्या लॉगीनवरून प्रवेश द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात यापूर्वी शासनाने निर्धारित केलेल्या प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रथम, द्वितीय व तृतीय फेरी अंतर्गत सुमारे सव्वा चारशे विद्यार्थ्यांनी विविध अध्यापक विद्यालयांत प्रवेश घेतले आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतला होता, परंतु काही कारणाने पडताळणीमध्ये विद्यार्थी बाहेर पडले असतील अशा विद्यार्थ्यांनी व नव्याने प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांनी या कालावधीत ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या पडताळणी विभागातून तात्काळ पडताळणी करून आपला प्रवेश निश्चित करावा.

– डी. डी. सूर्यवंशी, प्राचार्य- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर.

- Advertisment -

ताज्या बातम्या