Friday, April 26, 2024
Homeनगरडिजेच्या आवाजात ईद-ए-मिलाद मिरवणूक

डिजेच्या आवाजात ईद-ए-मिलाद मिरवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरात रविवारी पार पडलेल्या ईद-ए-मिलाद सणाच्या मिरवणुकीत डीजेवर मोठ्या आवाजात गाणी वाजवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची, तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीक्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याची घटना घडली आहे. झेंडीगेट आणि हातमपुरा परिसरात मिरवणुकीत हा प्रकार घडला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

पोलीस अंमलदार उमेश शेरकर यांच्या फिर्यादीवरून 24 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कासीम ईब्राहिम शेख, शहाफैसल बुर्‍हाण सय्यद उर्फ शानू, ईब्राहिम युसूफ खान, अब्दुल कादीर अब्दुल करीम शेख, अजहर अन्सार सय्यद (सर्व रा. तख्ती दरवाजा), शेखर चंद्रकांत म्हस्के (रा. दाळमंडई), शाहरूख अब्दुल रऊफ शेख, शहानवाज अकबर शेख (दोघे रा. इमामवाडा), ईलियास हसन शेख, शेख सद्दाम अन्वर, बाहिद गफूर शेख (सर्व रा. भोपळे गल्ली), शाहरूख अन्वर शेख, शाहरूख अस्लम मनियार (रा. माळीवाडा), देविदास तुकाराम वैराळ (रा. भूषणनगर, केडगाव), आरीफ आय्युब पठाण, साजीद सलीम शेख, वसीम रहेमत पठाण, वसीम नईम शेख, नजीर कदीर पठाण, निसार नईम शेख (सर्व रा. काटवण खंडोबा), भगवान राजेंद्र कोबणे (रा. डिग्रस, ता. राहुरी) तसेेच तख्ती दरवाजा येथील ईद मिलाद कमिटी, माळीवाडा यंग पार्टी आणि काटवण खंडोबा येथील जंगे शहिदा यंग पार्टी यांचा समावेश आहे.

पोलीस अंमलदार योगेश खामकर यांच्या फिर्यादीवरून 41 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अजिम नुरमहंमद राजे (रा. तांबटकरगल्ली), नौशाद अली हसन खान (रा. पोखर्डी ता. नगर), सलमान हमिदअली खान (रा. काटवण खंडोबा रोड), कृष्णा माणिक घाडगे (रा. डिग्रस, ता. राहुरी), नदीम अजिज तांबोळी (रा. मक्का मस्जीद जवळ), सज्जाद इकबाल शेख (रा. कोठला झोपडपट्टी), मोहंमद सकलेन अल्ताफ शेख (रा. सर्जेपुरा), बहुद्दीन फौजुद्दीन खान (रा. बाराईमाम कोठला), शम्स अब्दुल जलिल शेख (रा. गंजबाजार), फैजान तसव्वर शेख (रा. सर्जेपुरा), युसूफ रिजवान मनियार शेख (रा. किंगगेट), राहील अल्ताफ खान (रा. मुकुंदनगर), तनवीर अजिज तांबोळी (रा. मक्का मस्जिद जवळ), फैजान जावेद शेख (रा.गंजबाजार), प्रकाश विकास मुसळे (रा. मंगलगेट), सय्यद सदाम महंमद अली (रा. झेंडीगेट), सर्फराज इकबाल शेख (रा. रामचंद्रखुंट), अल्फेज शोएब रीफ शेख (रा. सुभेदारगल्ली), तेजिब समिर शेख (रा. सुभेदारगल्ली), जुनेद अस्लम शेख (रा. बुडण फौजदार मस्जिद जवळ), प्रशांत बाबासाहेब सोनवणे (रा. कुकाणा ता. नेवासा) शाहीद आसिफ सय्यद (रा.आनंदीबाजार), अरियान अकिल अहाद शेख (रा.औरंगाबाद रोड), अब्दुल गफार हुसेन सय्यद, शादाब अहमद कदीर अहमद शेख, आवेन शकील खान, सोनू मुक्तार शेख, जुनेद आरीफ सय्यद, सईद अन्वर परवेज शेख (सर्व रा. नटराज हॉटेलजवळ), अमोल दिगंबर कर्पे (रा. मेहेकरी), वसीम शफिक खान (रा. माळीवाडा), अमिर हमिद बागवान (रा. बागवान गल्ली), अर्शान अस्लम बागवान (रा. कबाडगल्ली), मोहंमद सालेम इम्रान सय्यद (रा. पंचपीर चावडी), अयान नासिर बागवान (रा. भिस्तगल्ली), रेहान युनूस सय्यद (रा. नांगरेगल्ली), अरियान हानिफ शेख (रा. पंचपीर चावडी), शेख अफ्रिद अशपाक (रा. कबाडगल्ली), महंमद फैज आसिफ बागवान (रा. कबाडगल्ली), आमन महेमूद शेख (रा. रामवाडी) आणि रिजवान मुजप्फर शेख (रा. सर्जेपुरा) यांचा समावेश आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून ईद-ए-मिलाद मिरवणुकीस भिंगार पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही नगर-औरंगाबाद रोडवरील पंचवटी हॉटेलसमोरून मुज्जमील काय्युम शेख, फरहान फय्याजुद्दीन शेख (दोघे रा. मुकुंदनगर) व खालीद कादीर खान (रा. गोविंदपुरा) यांनी मिरवणूक काढली. याप्रकरणी त्यांच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार सचिन धोंडे यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या