Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारजिल्हयातील ३९ अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

जिल्हयातील ३९ अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

जिल्हयातील ३९ अंमलदारांना पोलीस (police) उपनिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी पोलीसांना दिवाळीनिमित्त (diwali) पदोन्नतीची भेट दिली आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देवून त्यांची दिवाळी गोड करण्याची संकल्पना मांडली. त्यांनी तात्काळ मंत्रालयीन कर्मचार्‍यांना तात्काळ पदोन्नतीबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

मंत्रालयीन कर्मचारी यांच्याकडून पदोन्नतीची कार्यवाही करुन पदोन्नतीस पात्र असणार्‍या ३९ अंमलदारांना आज दि.२२ ऑक्टोबर रोजी स्वत: पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्या दालनात उपस्थित राहण्याचे कळविले.

पी.आर.पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील एकुण ३९ सहा.पोलीस उप निरीक्षक यांना सेवाजेष्ठतेनुसार पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती देऊन दीपोत्सवाची भेट दिली आहे.

पदोन्नती झालेल्या जिल्ह्यातील ३९ पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षक कार्यालय येथे एक छोटेखानी पण दिमाखदार कार्यक्रम आयोजित करुन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी पोलीस अंमलदारांना पोलीस उप निरीक्षक पदाचे दोन स्टार लावून पोलीस अभिनंदन केले.

यावेळी पी.आर.पाटील, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, संभाजी सावंत, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरणकुमार खेडकर, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, राखीव पोलीस निरीक्षक देवनाथसिंग राजपूत आदी उपस्थित होते.

श्री.पाटील यांनी मागील एक वर्षाच्या काळात जिल्हा घटकाच्या आस्थापनेवरील पोलीस अंमलदारांपैकी पोलीस शिपाई पदावरुन पोलीस नाईक पदावर ७१, पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर ६०, पोलीस हवालदार पदावरुन सहा. पोलीस उप निरीक्षक पदावर ४७ अशा एकुण १७८ पोलीस अंमलदारांना पदोन्नतीची भेट दिली आहे.

आज दि.२२ ऑक्टोबर २०२२ रोजी ३९ सहाय्यक पोलीस उप निरीक्षकांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली.

पदोन्नती झालेले पोलीस अंमलदार

अंकुश बाबुलाल खेडवन, जगन रेशमा वळवी, राजू काशिनाथ मोरे, सुशिल बाबुराव सोमवंशी, सुरेश लाला चव्हाण, कमलसिंग मुरलीधर पवार, विजय जगन्नाथ पाटील, स्वरुपसिंग शिड्या गावीत, दिलीप मौल्या गावीत, जगदिश बाबुलाल सोनवणे, युवराज राजाराम वाणी, सखाराम नादर्‍या वळवी, विष्णू बाबुराव गायकवाड, कांतीलाल मांगड्या कोकणी, राजेंद्र राजाराम सोनवणे, रमेश फाड्या पावरा, अविनाश यशवंत पंडित, बळवंत दिवाण वळवी, रविंद्र भिमराव लोंढे, रविंद्र शांताराम पाटील, योगेश जयराम गांगुर्डे, राजेश शंकर पाटील, शिवाजी सुरेश काटकर, रुदाम ओंकार न्हावडे, संजय रामदास जाणे, दयाराम सित्या वळवी, राजेंद्र पंडित साळुके, उत्तम दामु वळवी, वेडू गबाजी जाधव, भिकाजी खाल्या वळवी, अनिल वसंतपुरी गोसावी, श्रावण पिरन बिरारी, मगन रामसिंग गावीत, प्रकाश नथ्थू भाबड, किशोर नारायण बडगुजर, अंबालाल बंडु मोरे, शिवदास रुपचंद देवरे, रमेश वादु गायकवाड, गणपत सुक्राम भिल.

- Advertisment -

ताज्या बातम्या