Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआली माझ्या घरी ही दिवाळी!

आली माझ्या घरी ही दिवाळी!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सणांचा राजा असलेला दिवाळी सण आजपासून साजरा होणार आहे. त्यासाठी सर्वच सज्ज झाले आहेत. संंकटे अनंंत असली तरी दिवाळ सणावर त्याचा तसूभरही परिणाम होणार नाही याची दक्षता प्रत्येक घरधनी घेत आहे. दोन वर्षांच्या करोना संकटानंतरची ही पहिलीच दिवाळी खुल्या निरोगी वातावरणात साजरी होणार आहे.

- Advertisement -

यंदा दिवाळीसाठी कामगारांना भरघोस बोनस मिळला आहे. कर्मचार्‍यांंचे पगारही जमा झाले आहेत. आज वसुबारसपासून दिवाळीस प्रारंभ होणार आहे. बहुतांश ठिकाणी धनत्रयोदशी 22 ऑक्टोबरला आहे, तर काही ठिकाणी 23 ऑक्टोबरला साजरी होणार आहे. अशा परिस्थितीत 22 आणि 23 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी धनत्रयोदशी साजरी होण्याची शक्यता आहे. 25 तारखेला सूर्यग्रहण असल्यामुळे दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी गोवर्धन पूजा होणार आहे.

कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोषकाळात धनत्रयोदशीची पूजा करणे शास्त्रानुसार असल्याने 22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी करणे योग्य ठरणार आहे. धनत्रयोदशी तिथी 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6:02 ते 23 ऑक्टोबर रोजी 6:03 पर्यंत आहे. यावर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला वसुबारसने सुरू होत आहे आणि 27 ऑक्टोबरला भाऊबीजेला संपणार आहे.

24 तारखेला दिवाळी आहे आणि दुसर्‍या दिवशी सूर्यग्रहण आहे. त्यामुळे गोवर्धन पूजा दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी होणार नाही. ती 26 ऑक्टोबरला होईल. त्याचप्रमाणे यंदा भाऊबीज दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी नसून तिसर्‍या दिवशी 27 ऑक्टोबरला आहे. दिवाळीकाळात चार दिवस सुट्टीचा आनंद कर्मचार्‍यांना मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या